Just another WordPress site

“हे सरकार विकासासाठी स्थापन झालेले नाही तर हे सरकार ईडीमुळे आले आहे” विजय वडेट्टीवार यांचा जोरदार शाब्दिक हल्ला

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१३ जुलै २३ गुरुवार

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या खातेवाटप आणि मंत्रीमंडळावर बोलताना जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे तसेच शिंद गटाने कितीही विरोध केला तरी अर्थमंत्रीपद अजित पवारांनाच मिळेल असा मोठा दावा केला.यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचाही उल्लेख केला तसेच शिंदे गटाचा स्वाभिमान काढत थेट आव्हान दिले ते आज दि.१३ जुलै गुरुवार रोजी टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.विजय वडेट्टीवार म्हणाले की,शिंदे गटाकडून अजित पवारांना अर्थखात देण्याला विरोध होत आहे कारण ते आधी जाहिरपणे म्हणाले होते की अजित पवार त्यांना निधी देत नाहीत.अजित पवारांमुळे आम्हाला शिवसेनेतून  बाहेर पडावे लागले.आता अजित पवारांना जाहिरपणे सांगा की,आम्ही राहू शकत नाही.शिंदे गटात थोडासा जरी स्वाभिमान असेल त्यांच्या शब्दाला काही किंमत असेल तर त्यांनी हे बोलून सरकारमधून बाहेर पडले पाहिजे.अर्थखाते हे अजित पवारांनाच मिळेल कारण देवेंद्र फडणवीसांनी त्यांना अर्थखाते देण्याचे आश्वासन दिले आहे.आता फडणवीस शिंदे गटाची समजूत काढतील.आम्ही लक्ष घालू,आमचे लक्ष राहील,मागच्याप्रमाणे आम्ही अन्याय होऊ देणार नाही असे फडणवीस सांगतील मात्र ते अजित पवार आहेत ते कुणालाही ऐकणार नाहीत असा दावा विजय वडेट्टीवारांनी केला आहे.

हे सगळे प्रकार होणार आहेत यातून यांचे जे व्हायचे ते होईल मात्र महाराष्ट्रातील जनतेचे प्रचंड नुकसान होणार आहे असेही वडेट्टीवारांनी नमूद केले आहे.विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले,देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघेही ‘टेरर’ नेते आहेत त्यामुळे दोन्ही ‘टेरर’ नेते एका ठिकाणी कसे राहू शकतील मागच्या वेळीही याचा उल्लेख केला होता.आता नेमकी काय अपरिहार्यता आहे हे कळले नाही की वरिष्ठांचा आदेश आहे की इतर कशामुळे हे झाले आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे.हे सरकार विकासासाठी स्थापन झालेले नाही.हे सरकार ईडीमुळे आले आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे हे लपून राहू शकत नाही.आमच्या एका नेत्याने सांगितले तसे हे काल राजे होते आज सुभेदार व्हायला निघाले आहेत. एका छोट्या राज्याचे राजे असणारे स्वतः निर्णय घेणारे आज दुसऱ्यांवर अवलंबून राहत आहेत यावरून त्यांची जनतेतील प्रतिमा उंचावत आहे की खालावत आहे हे जनता ठरवेल असे मत वडेट्टीवारांनी व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.