यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ जुलै २३ शुक्रवार
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ही एसटी बसने शाळेत जात असतांना बसमध्ये तरुणांनी गर्दीचा फायदा घेत मुलीची छेडखानी करीत विनयभंग करून त्या मुलीच्या कुटुंबीयांना मारहाण केल्याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्ह्यातील संशयीत आरोपींना अद्यापि अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहीती अशी की,यावल तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलगी ही नियमीतपणे आपल्या गावाहुन शिरागड ते यावल एसटी बसने दि.८ जुलै ते १३ जुलै रोजी सकाळी १o वाजेच्या सुमारास मौजे पथराळे ते साकळी गावाच्या दरम्यान शिरगड तालुका यावल येथील राहणारे आदीत्य ज्ञानेश्र्वर सोळंके,तुषार सुर्यभान सोळंके,प्रशांत कैलास सोळंके,सुर्यभान आधार सोळंके या सर्व संशयीत आरोपींनी एसटी बसमध्ये गर्दीचा फायदा घेत इयत्ता १० वीत शिकणाऱ्या शाळकरी अल्पवयीन मुलीच्या शरीराला स्पर्स करून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून त्या अल्पवयीन मुलीला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.यावेळी जाब विचारण्यास गेलेले शुभम राजाराम धिवर,गोपाळ शांताराम धिवर,हुताशिणी गोपाळ धिवर सर्व राहणार पथराळे यांना चापटा बुक्यांनी व काठीने मारहाण केली.या सर्व घटनेबाबत अल्पवयीन मुलीने यावल पोलीस ठाण्यात सर्व संशयीत आरोपी यांच्या विरूद्ध फिर्याद दिल्याने भादवी कलम ३५४ (डी) ३२४,५०४,५०६ ३४ व बाल लैंगिक अत्याचार पासुन सरंक्षण कलम ८,१२ पॉस्को कायद्दा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक सुनिल मोरे हे करीत आहे.