Just another WordPress site

अजित पवारांकडे अर्थ खाते सोपवल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे “Desk cleared ! डेस्क क्लिअर्ड”असे दोन शब्दांचे ट्वीट

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ जुलै २३ शनिवार

दि.२ जुलै रविवार रोजी अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तसेच राष्ट्रवादीच्या एकूण नऊ मंत्र्यांचा शपथविधीही त्याच दिवशी पार पडला.आधी शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाला आणि त्यानंतर वर्षभराने अजित पवारांनी सत्तेत येण्याचा निर्णय घेतला.काल दुपारी खातेवाटप करण्यात आले त्यात अजित पवारांना अर्थ खाते देण्यात आले असून या खाते वाटपानंतर देवेंद्र फडणवीस यांनी “Desk cleared ! डेस्क क्लिअर्ड” असे फक्त दोन शब्दांचे ट्वीट केले आहे यादरम्यान त्यांनी ट्वीटरवर काही सह्या करतानाचे फोटो त्यांनी ट्वीट केले आहेत.देवेंद्र फडणवीस यांचे हे ट्वीट चर्चेत आहे कारण अजित पवारांकडे अर्थखात्याची धुरा दिल्यानंतर अवघ्या दोन शब्दांचे हे ट्वीट आहे.इतके दिवस हे खाते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते व आता लागलीच अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.अजित पवार हे महाविकास आघाडीत अर्थमंत्री होते.एकनाथ शिंदे यांनी बंड केले त्यानंतर जेव्हा ते बाहेर पडले तेव्हा त्यांनी अजित पवारांवरही टीका केली होती.अजित पवार यांनी निधी वाटपात पक्षपातीपणा केला होता.शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटताना दुजाभाव केल्याचे म्हटले होते अशात आता अर्थखाते हे अजित पवारांकडेच आले आहे.

यात अजित पवार यांनी भाजपाकडील सहा खाते व शिवसेनेकडील तीन खाते अशी एकूण नऊ महत्त्वाची खाती आपल्याकडे ठेवण्यात यश मिळविले आहे.यातील अर्थ खाते हे अजित पवारांकडे देण्यात आले आहे हे खाते आधी भाजपाकडे होते आणि देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री होते मात्र आता अजित पवार अर्थमंत्री असतील.कृषी हे खाते नव्या खातेवाटपात धनंजय मुंडेंना देण्यात आले आहे ते आधी शिवसेनेच्या अब्दुल सत्तार यांच्याकडे होते.भाजपाच्या अतुल सावे यांच्याकडे असलेले सहकार खाते आता राष्ट्रवादीच्या दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले आहे.भाजपाच्या रविंद्र चव्हाण यांच्याकडे असलेले अन्न आणि नागरी पुरवठा खाते हे छगन भुजबळ यांना देण्यात आले आहे.शिवसेनेच्या संजय राठोड यांच्याकडे असलेले अन्न आणि औषध प्रशासन खाते हे राष्ट्रवादीच्या धर्मराव बाबा अत्राम यांना देण्यात आले आहे.भाजपाच्या गिरीश महाजन यांच्याकडे असलेले क्रीडा आणि युवक कल्याण खाते हे संजय बनसोडेंना देण्यात आले आहे.भाजपाच्या मंगलप्रभात लोढांकडे असलेले महिला आणि बालकल्याण खाते हे राष्ट्रवादीच्या आदिती तटकरेंना देण्यात आले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे असलेले मदत आणि पुनर्वसन खाते हे राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांना दिले गेले आहे.नव्या खातेवाटपाचा विचार केला तर हे लक्षात येते की राष्ट्रवादीला जी खाती मिळाली आहेत त्यात भाजपाकडे असलेली सहा खाती आणि शिवसेनेकडे असलेल्या तीन खात्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.