Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ जुलै २३ शनिवार
राज्य सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच अजित पवार यांनाही उपमुख्यमंत्री केल्यानंतर या दोन उपमुख्यमंत्री नियुक्तीच्या अनुषंगाने आता आमच्या गावच्या विकासासाठी दोन उपसरपंच हवेत असा ठराव सातारा जिल्ह्यातील सोनापूर (ता.सातारा) ग्रामपंचायतीने मासिक सभेत केला आहे याबाबतचे निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.राज्याच्या राजकारणाचे गावपातळीवर प्रतिबिंब उमटल्याचे हे उदाहरण आहे.परंतु गावाला दोन उपसरपंच मिळण्यासंदर्भातील ठराव नोंदवून घेण्यास ग्रामसेवकाने नकार दिला आहे तर या ठरावाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करावे अशा मागणीचा ठराव ग्रामपंचायत सदस्यांनी केला असल्याने आता या प्रकरणात काय कार्यवाही होते व निर्णय होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे.
सोनापूरच्या सरपंच सुनंदा खरात साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाल्या की,सोनापूर ही ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे.