Just another WordPress site

शानबाग विद्यालयात “करिअरवर बोलू काही” विषयावर मार्गदर्शन चर्चासत्र उत्साहात

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१७ जुलै २३ सोमवार

येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानभाग विद्यालयात येथे “करिअरवर बोलू काही”या विषयावर दि.१५ जुलै रोजी संदीप पाटील (सोनवणे) जिल्हा बाल कल्याण समिती सदस्य तसेच संस्थापक सचिव स्वयंदीप प्रतिष्ठान यांचे मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

यावेळी गुणवत्ता वाढ आणि विकास विभागातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “करिअरवर बोलू काही” या विषयावर डांभुर्णी तालुका यावल येथील रहीवासी संदीप पाटील(सोनवणे) संस्थापक सचिव,स्वयंदीप प्रतिष्ठान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व करिअर समुपदेशक यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील आणी जगदीश चौधरी तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.गुणवत्ता वाढ आणि विकास विभागाचे प्रमुख अनिल धामणे यांनी प्रास्ताविकातून व्याख्यात्यांचा परिचय करून दिला.संदीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,आपण आपल्यातील क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळले पाहिजे त्यासाठी आपले ध्येय निश्चित असले पाहिजे तसेच योग्य वेळी व योग्य वयात योग्य पर्याय निवडला तर आपण पुढील आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो असे त्यांनी सांगितले.त्याचबरोबर आपल्यातील न्यूनगंड आपण कमी केला पाहिजे आपल्याला योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्यामुळे प्रगतीत अडथळे निर्माण होतात व बदलत्या काळानुसार स्वतःला बदलले पाहिजे तसेच आपला आत्मविश्वास वाढवला पाहिजे तसेच एमपीएससी व यूपीएससी आयोगामार्फत कोणत्या अधिकारी पदाच्या परीक्षा घेतल्या जातात त्यासाठी कशी तयारी करावी,अधिकारी व्यक्तींना असलेले अधिकार,संरक्षण दलातील करिअर त्यासाठी शालेय स्तरावर महाविद्यालयीन स्तरावर असणाऱ्या प्रवेश परीक्षा याविषयी पीपीटी प्रेझेंटेशन द्वारे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे आभार वैशाली नारखेडे यांनी मानले प्रसंगी विद्यार्थी व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.