मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज दि.१७ जुलै पासून सुरुवात झाली असून त्याच पार्श्वभूमीवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर काँग्रेस आणि शिवसेनेच्या ( ठाकरे गट ) आमदारांनी सरकारविरोधात आंदोलन करत घोषणाबाजी केली आहे.यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार गैरहजर होते त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे यावर आमदार सचिन अहिर यांनी भाष्य केले असून ते विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सचिन अहिर म्हणाले,काही लोक नक्की आंदोलनाला आले होते पण आज पहिलाच दिवस असल्याने सर्वांची उपस्थिती नाही आहे,काहीजण येत आहेत,संयुक्तरितीने मंगळवारी सर्वजण आलेले दिसतील.पायऱ्यांपेक्षा सभागृहात काय भूमिका घेतली जाते हे महत्वाचे आहे.आमदारांना एक-दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करावी लागेल.ज्या मतदारांनी आमदारांना मतदान केले आहे त्यांनाही उत्तर द्यावे लागणार आहे नाहीतर आगामी काळात त्याच लोकांसमोर जात असताना तुमची भूमिका अशी का राहिली? असा जाब लोक विचारतील कारण मतदारांच्या मनात लोकप्रतिनिधींबद्दल दृष्टीकोन बदलत चालला आहे हे चित्र स्थिर करायचे असेल तर आपल्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतील असे सचिन अहिर यांनी म्हटले आहे.विरोधी पक्षाच्या बैठकीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंगळुरूला रवाना झाले आहेत व आदित्य ठाकरेही रवाना होतील अशी माहिती सचिन अहिर यांनी दिली आहे.