मुंदखेडा येथील अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करण्याबाबत कासार समाजाचे तहसीलदारांना निवेदन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
राज्यातील मराठवाडा क्षेत्रातील निवघा तालुका मुंदखेड जिल्हा नांदेड येथे कासार समाजाची अल्पवयीन मुलगी हिच्यावर गावगुंड ज्ञानेश्वर पवार उर्फ सोन्या यांने वर्षभर अनेक वेळा छेडछाड केल्याने दि.१२ जुलै २३ रोजी तिचा बळी गेला असून सदरील मुलगी अल्पवयीन असल्यामुळे आरोपीवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करावा व आरोपींवर कठोर कार्यवाही करावी या मागणीसाठी यावल व संपूर्ण महाराष्ट्रातील कासार समाज यांच्या वतीने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,सदरील आरोपींविरुद्ध बाललैंगिक अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात कासार समाज आंदोलन छेडण्यात येईल व होणाऱ्या परिणामास महाराष्ट्रातील कासार समाज जबाबदार राहणार नाही असेही या निवेदनात नमूद केलेले आहे. या निवेदनावर विजय कासार,सचिन कासार,अशोक कासार,गोविंदा कासार,मिलिंद कासार,चंद्रकांत कासार,अभंग कासार,सुभाष कासार,मुरलीधर कासार,विनोद कासार,सचिन कासार,यश कासार,प्रेम कासार,धंनजय कासार,अमोल कासार, प्रशांत कासार,संतोष कासार,वैभव कासारसह समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहेत.