यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ जुलै २३ सोमवार
येथील महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील थोर संतश्री सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त श्री.संत सावता माळी समाज मंडळ यावल यांच्या वतीने साजरी करण्यात आली.
यावेळी महर्षी व्यास महाराज यांच्या मंदीर परिसरातील सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन केले होते दरम्यान माळी समाजाच्या वतीने वाड्यातील समाज मंदिरात पालखी पुजन करून पालखी दिड्डी मिरवणूक काढुन व्यास मंदिरात संमाप्त झाली.यावेळी श्री.संत सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री संत सावता महाराजांचे दर्शन घेतले.या कार्यक्रमास उपस्थित माळी समाज बांधवांशी संवाद आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.कुदन फेगडे यांनी साधला.याप्रसंगी उमेश फेगडे (तालुकाध्यक्ष भाजपा),भुसावळ नगरीचे शिल्पकार मा.आमदार संतोषभाऊ चौधरी याचे चिरंजीव जयश चौधरी,यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन,सुनिल माळी,श्रीसंत सावता माळी समाज मंडळचे अध्यक्ष सुनिल वारुळ देवेंद्र माळी,उपाध्यक्ष महेश महाजन ,सचिव जयवंत माळी,खजिनदार किशोर पाटील,राकेश माळी,प्रकाश महाजन,प्रशांत पाटील,नारायण माळी,विश्वनाथ देवरे,बाळू माळी,किशोर माळी,संत सावता माळी समाज मंडळ यावल,महात्मा ज्योतिबा फुले युवा लेझीम मंडळ,सावित्रीबाई फुले महिला मंडळ,नाथ संप्रदाय भजनी मंडळी आदींची उपस्थिती होती.