यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ जुलै २३ बुधवार
राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद संघटनेतर्फे काल दि.१८ जुलै मंगळवार रोजी यावल तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संतोष विनंते यांना देण्यात आले.
यावेळी भारतामध्ये विभिन्न राज्यामध्ये आदिवासी समाजाचे वास्तव्य असून त्यांची संस्कृती तसेच पाणी,जंगम मालमत्ता व जमीन यांचा असंविधानिक मार्गाने संसदेद्वारा कानून तयार करून आदिवासी बांधवांना त्यांच्या समाजिक,शैक्षणिक,धार्मिक,राजनीतिक व सांस्कृतिक अशा विभिन्न रीती रिवाजांना साबूत ठेवण्यासाठी आंदोलकांच्या वतीने मॅग्ननचे निवेदन काल दि.१८ जुलै रोजी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना देण्यात आले.प्रसंगी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद यावल तालुकाअध्यक्ष समीर हमजान तडवी,रमजान तडवी,सलीम पठाण,रोनक तडवी,इरफान तडवी,बिलकीश तडवी,कुंदन तायडे,पंकज तायडे,संतोष तायडे,शशिकांत सावकारे,भानुदास महाजन,भूषण हातकर,शुभम कापडे,जयवंत कापडे,सागर गजरे या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलनात सहभाग घेऊन आंदोलन यशस्वितेकरिता प्रयत्न केले.