यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१९ जुलै २३ बुधवार
येथील शहरात राहणाऱ्या एका शिक्षकाच्या पत्नीचा घरात घुसून धमकी देत मनाला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील चाळे करीत सदरील महिलेचा विनयभंग करीत घरातील मोबाईल हिसकावून नेल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार यावल शहरात एका परिसरात राहणारी शिक्षकाची पत्नी ही दि.१८ जुलै मंगळवार रोजी पती शाळेत गेले असता घरात एकटी असल्याचे पाहुन दुपारी ३ वाजेच्या सुमारास संशयशीत व्यक्ति सचिन पंडीत राहणार कुंभारटेकडी यावल हा घरात घुसला व फिर्यादी विवाहीत महिलेशी अश्लील चाळे करीत विनयभंग केला.दरम्यान पती घरी आल्यावर महिलेने सर्व घडलेल्या प्रकाराची माहिती पतीस दिल्यावर याबाबत महिलेने दिलेल्या तक्रारी वरुन सचिन पंडित याच्या विरुद्ध यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत संबधीत व्यक्ति विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात भादवी कलम ३५४, ३२७, ४५२,५०६ अन्वये विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.