Just another WordPress site

आक्षेपार्ह व्हिडीओप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची तत्परतेने तपासाला सुरुवात

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.१९ जुलै २३ बुधवार

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओचे विधिमंडळात पडसाद उमटले असून महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या सोमय्या यांना भाजपा पाठीशी घालणार का? असा सवाल विरोधकांनी विधान परिषदेत केला यावर सोमय्या यांच्यावरील आक्षेपार्ह व्हिडीओची वरिष्ठ पातळीवर सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली.याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन केले.दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलीस सक्रिय झाले आहेत.किरीट सोमय्या यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.अंबादास दानवे यांनी हा मुद्दा विधान परिषेदत उचलून धरला.विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पेन ड्राईव्ह सादर करत याप्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली.दरम्यान याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांना चौकशीचे आदेश दिल्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तत्परतेने तपास करण्यास सुरुवात केली आहे.तांत्रिक (Technical) आणि सायबर तज्ज्ञांच्या मदतीने गुन्हे शाखा युनिट १० या व्हिडीओमागची सतत्या तपासणार आहेत अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमय्या यांच्या ध्वनिचित्रफितीचा मुद्दा उपस्थित केला.केंद्रीय सुरक्षा दलाच्या सुरक्षा व्यवस्थेत फिरणारे किरीट सोमय्या कोणते धंदे करतात हे समोर आले आहे यामुळे त्यांची सुरक्षा व्यवस्था तात्काळ काढून घेण्यात यावी अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली तसेच आठ तासांच्या कालावधीच्या ध्वनिचित्रफितीचा पेनड्राइव्ह दानवे यांनी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे सुपूर्द करीत याची चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.किरीट सोमय्या हे मराठीद्रोही असून राजकीय दलाल आहेत असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला आहे.विरोधी पक्षांनी हा मुद्दा उचलून धरत चौकशीची मागणी केल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करण्याची घोषणा केली.माझ्या संदर्भात काही ध्वनिचित्रफिती समाज माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या आहेत.माझ्याकडून महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करण्यात येतो तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अत्याचार झालेला नाही असा खुलासा किरीट सोमय्या यांनी केला आहे तसेच प्रसारित झालेल्या ध्वनिचित्रफितीची सत्यता तपासावी अशी मागणी सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.कथित आक्षेपार्ह चित्रफितीप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे त्याबाबत पोलीस तपासणी करीत आहेत.विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिलेला पेनड्राइव्ह मी महिला पोलीस अधिकारी आणि महिला डॉक्टरांच्या मदतीने तपासणार आहे.आपली सभागृहातील चर्चा ऐकून या प्रकरणात शोषण झालेल्या महिलेने तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आले पाहिजे यापूर्वी अनेक महिला सभागृहातील चर्चा ऐकून तक्रार दाखल करण्यासाठी पुढे आल्या आहेत या महिलेने देखील पुढे यावे असे उपसभापती गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.