Just another WordPress site

“शाळकरी मुलांमुळे गावातल्या लोकांना दरड कोसळल्याची माहिती मिळाली” प्रत्यक्षदर्शीची माहिती

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२० जुलै २३ बुधवार
ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर काल दि.१९ जुलै बुधवार रोजी रात्री मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दरड कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेमध्ये जवळपास ३० ते ४० घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेल्याचे सांगितले जात आहे.या घरांमध्ये जवळपास १०० नागरिक मलब्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.या दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची बचावपथक घटनास्थळी दाखल झाली आहेत.खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,मंत्री उदय सामंत,दादा भुसे आदी मंत्रीही त्या ठिकाणी पोहोचले आहेत.काल दि.१९ जुलै बुधवार रोजी रात्री ईर्शाळगडावरच्या ठाकूरवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे.ईर्शाळवाडीच्या पायथ्यापासून काही उंचीवर ठाकूरवाडी आहे मात्र पायथ्यापासून ठाकूरवाडीपर्यंत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे पायवाटेनेच वाडीवर पोहोचता येत आहे त्यामुळे एनडीआरएफच्या पथकासमोर बचावकार्य पार पाडण्याचे मोठे आव्हान आहे.पक्का रस्ता नसल्यामुळे जेसीबी वगैरे मोठी यंत्र ठाकूरवाडीत नेता येत नसल्यामुळे सध्या एनडीआरएफकडून कुदळ,फावड्यासारख्या हत्यारांच्या मदतीनेच ढिगारा उपसण्याचे काम चालू आहे.
दरम्यान रात्री नेमके काय घडले? याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने टीव्ही ९ शी बोलताना माहिती दिली आहे.या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार काही शाळकरी मुलांमुळे गावातल्या लोकांना दरड कोसळल्याची माहिती मिळाली आणि तेव्हा अनेक गावकरी घरातून बाहेर आल्याचे सांगितले.सदरील घटना हि रात्री ११ वाजता अचानक घडली त्यावेळी शाळेतली काही मुले मोबाईलवर व्हिडीओ बघत होती त्यांना वरून येणाऱ्या दगडांचा आवाज आला व त्यांनी आरडाओरडा केला तेव्हा गावातल्या लोकांना माहिती झाले तसेच जेवढे वाचायचे तेवढे वाचले व बाकी सगळे ढिगाऱ्याखाली दबले गेले अशी माहिती या प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून जाहीर केली आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.