Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि ओडीशा किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात पाऊस पडत असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.आज दि.२१ जुलै शुक्रवार रोजी नाशिक,लातूर,नांदेड,परभणी,हिंगोली,यवतमाळ,अमरावती,नागपूर,वर्धा,अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे.तसेच २२ ते २४ जुलै दरम्यान राज्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याबाबत हवामान खात्याकडून कळविण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात विविध जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली असून पुढील २४ तासांत पालघर,रायगड,ठाणे,सातारा आणि पुण्यात पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला असून मराठवाड्यातही पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे.दरम्यान नांदेड,लातूर,धाराशिव, परभणी,हिंगोली येथे वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.