यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ जुलै २३ शुक्रवार
कर्नाटक राज्यात जैन समाजाचे साधू आचार्य कामकुमार नंदी यांचे अपहरण करून त्यांचा खुन करण्यात आल्याच्या निषेधार्त काल दि.२० जुलै गुरुवार रोजी सकल दिगंबर जैन समाजच्या वतीने दहिगाव तालुका यावल येथे बंद पुकारण्यात येवुन गावातुन जैन समाज बांधवांच्या वतीने काळया फिती लावुन मुकमोर्चा काढण्यात आला तसेच आचार्य कामकुमार नंदी यांची हत्या करणाऱ्यांवर फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन यावल येथे तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना नुकतेच देण्यात आले.
याप्रसंगी दहिगावचे प्रथम नागरीक सरपंच अजय अडकमोल,यावल पंचायत समिती माजी गटनेते शेखर पाटील,दहिगावचे उपसरपंच देवीदास धांगो पाटील तसेच सकल दिगंबर जैन समाजातर्फ मोठया संख्येने समाज बांधव व महिला भगिनी उपस्थित होत्या.दरम्यान दि ५ जुलै रोजी चिक्कोडी गाव जिल्हा बेलगाम गावाजवळील हिरेकोडी येथील काही अज्ञात लोकांकडुन जैन साधुआचार्य कामकुमार नंदी यांचे अपहरण करून अज्ञात स्थळी त्यांची निघृणपणे हत्या करून त्यांच्या शरीराचे तुकडे करण्यात आल्याची घटना घडली असुन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने तात्काळ तपास यंत्रणाची चक्रे फिरवुन या हत्याप्रकरणी सहभागी असलेल्या संशयीत हुसैन दलाइट आणी नारायण माली या दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.या घटनेच्या पार्श्वभुमीवर निषेध म्हणुन काल दि.२० जुलै गुरुवार रोजी सकल दिगंबर जैन समाजाच्या वतीने दहिगाव गाव हे पुर्णपणे बंद ठेवण्यात आले.यावेळी गावातुन जैन समाज बांधवांच्या वतीने काळया फिती लावुन मुकमोर्चा काढण्यात आला व नंतर यावल तहसीलवर मोर्चा काढुन तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना शासनाने देशभरातील जैन साधुसंत यांच्या सुरक्षेविषयी कठोर कायदा करावा तसेच कर्नाटकाच्या निंदनिय घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.