अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२३ जुलै २३ रविवार
धामणगाव रेल्वे येथे गेल्या २४ तासापासून होणाऱ्या धुवाधार पावसामुळे सर्वत्र नदी नाल्याला पूर परिस्थिती निर्माण झाली असून तरीसुद्धा शेतकरी आपल्या शेतातील कामासाठी जात असल्याचे चित्र आहे.अशातच जळकापटाचे येथील शेतकरी उमेश मारुती मोडक वय ३४ वर्षे हे शेतात कामानिमित्त गेले असता घराकडे परत येतांनी गावाजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या लोंढ्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,धामणगाव रेल्वे परिसरात गेल्या काही दिवसांपासून संतत धार पाऊस सुरु असल्याने जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे.अशात शेतीची कामेही खोलमंडळी आहेत सदरहू शेतकरी वर्ग जसी सवड मिळेल तसे आपल्या शेतातील कामे उरकून घेत आहेत.त्यानुसार जळकापटाचे येथील शेतकरी उमेश मारुती मोडक वय ३४ वर्षे हे शेतात कामानिमित्त गेले असता घराकडे परत येतांनी गावाजवळ असलेल्या नाल्याला आलेल्या लोंढ्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे.सदरील घटनेची माहिती मिळताच काही नागरिकांनी याबाबतची माहिती प्रशासनाला दिली व त्यानुसार तळेगाव दशासर येथील पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेहचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले.उमेश मारुती मोडक यांच्या पश्चात वृद्ध आई शानुबाई मारोतराव मोडक वय ६५ वर्ष,पत्नी प्रगती उमेश मोडक वय २७ वर्ष,मुलगा विशांत उमेश मोडक वय दोन वर्ष असा परिवार उमेश वर अवलंबून होता त्यांच्या निधनाबद्दल परिसरात शोककळा व्यक्त केली जात आहे.