Just another WordPress site

खाटीक समाज परिवर्तन संघटनेतर्फे लोकमान्य टिळक जयंती व वनसंवर्धन दिन साजरा

अनिल गौर,पोलीस नायक

अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२४ जुलै २३ सोमवार

वातावरणातील वाढते प्रदुषण व पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास आणि त्याचे मानवी जिवनावर होत असलेले दुष्परिणाम याची जाणिव आता जोर धरु लागली असुन वृक्ष व वनसंवर्धन काळाची गरज आहे हा सामाजिक संदेश देण्याच्या उद्देशाने वनसंवर्धन दिन व लोकमान्य टिळक जयंतीचे औचित्य साधुन खाटीक समाज परिवर्तन संघटनेचे पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने वृक्ष रोपण व संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचा मानस जाहीर करण्यात आला.यानिमित्ताने काल दि.२३ जुलै रविवार रोजी शहरातील जुना बायपास स्थीत निंभोरा परिसरातील नवोदित होटल मनपसंदच्या परिसरात वड,पिंपळ,आवळा,कडुनिंब,जांभुळ अशा २५ वृक्षांची लागवड करुन वृक्षलागवडीच्या संकल्पाचा श्रीगणेशा करण्यात आला.

आगामी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आणखी भव्य स्वरुपात वृक्षलागवड केली जाणार असून त्याकरीता इच्छुक समाजबांधव व संघटनांनी एकत्र येऊन वृक्षांची रोपे संघटनेला दान करण्याचे व या समाजकार्यात सहभागी होण्याचे आवाहन खाटीक समाज परिवर्तन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.सदरील वृक्षलागवड प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे व सचिव मोहन नेहर यांचेसह रामेश्र्वर माहुरकर,विजयराव हरणे,मनोहरराव पारवे,माणिकराव नेहर,सुरेश माहुरे,जितेंद्र घनघोरकर व अन्य सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.