Just another WordPress site

“अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही गल्लीपासून दिल्लीच्या कार्यकर्त्यांची इच्छा”

शिंदे मंत्रीमंडळातील मंत्री अनिल पाटील यांची स्पष्ट भूमिका

दरम्यान अमोल मिटकरींच्या या ट्वीटवर बोलताना हसन मुश्रीफ यांनी १४५ च्या आकड्याचा उल्लेख केला.फक्त पोस्टर्स लावून कोणीही मुख्यमंत्री होत नाही त्यासाठी १४५ आमदार लागतात ही गोष्ट अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना अनेकदा सांगितली आहे असे ते म्हणाले.मात्र आता याचसंदर्भात त्यांचे मंत्रीमंडळातील व अजित पवार गटातील सहकारी अनिल पाटील यांनी टीव्ही ९ शी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.अनिल पाटील यांनी अमोल मिटकरींच्या म्हणण्याला दुजोरा दिला असून मात्र त्याचवेळी १४५ च्या आकड्याचा त्यांनी उल्लेख केला आहे. हे अमोल मिटकरी एकटे म्हणत नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गल्लीपासून दिल्लीच्या कार्यकर्त्यांना,नेत्यांना अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही आमची सगळ्यांचीच इच्छा आहे पण त्याबरोबर १४५ आमदारांचा आकडा गाठावा लागतो व तो गाठला गेला तर १०० टक्के अजित पवारच राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री होतील.आत्ता तो आकडा आमच्याकडे नसल्यामुळे शिंदे सरकारच्या पाठिशी आम्ही सगळे आहोत असे अनिल पाटील यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.