Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जुलै २३ सोमवार
सलग दोन वर्ष मुसळधार पावसामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांसह नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या सगळ्यांना सरकारकडून नुकसानभरपाई दिली जाणार आहे.विधान परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबतची माहिती दिली.अजित पवार म्हणाले आज विधीमंडळातील अनेक सदस्यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाचे मुद्दे मांडले.राज्यात १९ ते २३ जुलै या पाच दिवसात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली या काळात लोकांच्या घरात पाणी गेले तसेच शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अजित पवार म्हणाले राज्यात अतिवृष्टीमुळे ज्या-ज्या लोकांचे नुकसान झाले आहे त्यांना राज्य सरकारकडून मदत दिली जाईल.गेल्या पाच दिवसात यवतमाळ,अकोला,बुलढाणा,वाशिम आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मदत आणि पुनर्वसन मंत्री तसेच त्या-त्या जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यांचे दौरे करून नुकसानाची पाहणी केली आहे.
अजित पवार म्हणाले,पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली आहे.पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत केली जाईल.धोकादायक परिस्थिती असलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे.पूरस्थितीमूळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत तातडीने द्यावी.शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरु करावेत.ज्या ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असतील त्या ठिकाणीदेखील पंचनामे त्वरित सुरु करावेत.बाधित व्यक्तींना स्वस्त धान्य दुकानातून धान्याचे वाटप तातडीने त्याच दिवशी होईल याकरीता प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानांना पुरेसा धान्याचा पुरवठा करावा.ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते त्यांना सध्याच्या दराने पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची कार्यवाही तातडीने सुरु करावी अशा सूचना राज्य सरकारने जिल्ह्या प्रशासनांना दिल्या असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी केली.