Just another WordPress site

अमरावती जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी पदभार स्वीकारला

अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२५ जुलै २३ मंगळवार

नवनियुक्त जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी काल दि.२४ जुलै सोमवार रोजी माजी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार यांची शासनाने अमरावती जिल्हाधिकारी पदावर बदली केली आहे त्यानुसार त्यांनी आज जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.प्रसंगी श्रीमती पवनीत कौर यांनी सौरभ कटियार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा,निवासी उपजिल्हाधिकारी व्यवहारे,जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. वानखडे,जिल्हा पुर्नवसन अधिकारी अनिल भटकर,नगर प्रशासन अधिकारी सुमेध अलोने,जिल्हा खनिकर्म अधिकारी इम्रान शेख,विधी अधिकारी नरेंद्र बोहरा तसेच जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.