अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २३ मंगळवार
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहर येथे काल दि.२४ जुलै २३ सोमवार रोजी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या अश्लील कृत्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने अंजनगाव शहर व तालुका शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) वतीने येथील नवीन बसस्थानक परिसरातील अग्रसेन चौकात निषेध करून त्यांच्या फोटोची होळी केली तसेच सोमय्या यांना सुरक्षा देणाऱ्या शिंदे सरकारचा सुद्धा निषेध करण्यात आला.
नवीन बसस्थानक परिसरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते जमा झाले असता मोठा पोलिस बंदोबस्तसुद्धा याठिकाणी तैनात करण्यात आला होता.काही काळ वाहतूकसुद्धा विस्कळीत झाली होती.या आंदोलनात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे तालुकाप्रमुख कपिल देशमुख,शहर प्रमुख राजू आकोटकर,विधानसभा संघटक विकास येवले,महेंद्र दीप्टे,गजानन लवटे,सचिन गावंडे,गजानन चौधरी,सुभाष अस्वार,महेश खारोडे,श्याम येऊल,चंदू ढोरे,अभिजित भावे,संदीप पिंगे,बाळासाहेब काळमेघ,राहुल चौधरी,आदिल खातीब,गजानन पाटे, शुभम कहार,सागर काळपांडे,दादाराव राऊत,उमेश धुमाळे,सागर शिंदे,अंकुश होटे,अमोल फाटे,दिनेश सोनोने,रवींद्र नाथे,शुभम धुमाळे, गजानन शिंगणे,अफरोज सौदागर,फिरोज खान,बंटी देशमुख,सुरेश शनीसे,मारोती शिंदे,सुनील गौर,नितीन निंबोकार,सचिन लुटे यांची उपस्थिती होती.