“महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा”
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २३ मंगळवार
राज्यातील बांधकाम कामगारांना दुपारचे जेवण देण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजन योजनेत १०० कोटींचा घोटाळा झाला असून गोरगरिबांच्या तोंडातून घास काढण्याचा हा प्रकार असून मध्यान्ह भोजनाचे कंत्राट मिळालेल्या ३ कंपन्यांची चौकशी करावी अशी मागणी करत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे.सुषमा अंधारेंनी सांगितले की, एकनाथ खडसेंनी मिड डे मिलबाबत अधिवेशनात मुद्दा केल्या गेल्यानंतर २० फेब्रुवारी २०२३ ला गायत्री सोनावणे यांनी अटल योजनेतंर्गत किती लाभार्थ्यांना भोजन देता याची माहिती मागवली त्यावर ३५-४० हजार आकडा विभागाने सांगितला.दि.९ मार्चला अशी कोणती संस्था आहे ज्यांच्याकडून टेडर मागवली आणि त्यांची किती बिले दिली याची माहिती मागवली यावर ३० मे २०२३ रोजी उत्तर देताना मार्चपर्यंतची माहिती उपलब्ध करून दिली.
त्यात १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२२ या काळात १५ दिवसांच्या मध्यात्ह भोजनाचा खर्च ५८ लाख ६४ हजार रुपये खर्च आहे पण १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२२ या एक महिन्याच्या काळात २ कोटी ४७ लाखांचे बिल आहे कदाचित बांधकाम मजुरांची संख्या वाढली असावी.त्यानंतर नोव्हेंबरमध्ये १ ते ३० याकाळात ३ कोटी १३ लाख ५८ हजार रुपये खर्च होतो.डिसेंबरमध्ये ४ कोटी ५३ लाख ३४ हजार खर्च होतो.१ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२३ काळात ६ कोटी ९६ लाख ४७ हजार बिल होते.१ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारीत ७ कोटी ९९ लाख खर्च होतो त्यानंतर पुढच्या २ महिन्याचा खर्च एकनाथ खडसेंनी सभागृहात मांडले.आधीच्या ५ महिन्याचे बिल २५ कोटी रुपये काढले तर त्यानंतर २ महिन्याचे बिल २५ कोटी २६ लाख ६२ हजार ५५८ बिल काढले याचे लाभार्थी कोण याची माहिती मागवली.आयुक्त बिराजदार आहेत यात अधिकारी सहजासहजी असे करतील वाटत नाही.नेत्यांच्या वरदहस्ताशिवाय १०० कोटींचा घोटाळा होणे अवघड आहे असा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे.
थेट नावही घेतले
किती लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला त्याची माहिती शासनाकडे मागितली त्यांनी आम्हाला ज्या कामगारांची नावे दिली त्यांना आम्ही फोन केला त्यातील अनेकजण गुजरात,कर्नाटकातील लोक आहेत जे महाराष्ट्रात राहतच नाही.मध्यान्ह भोजनाच्या एका थाळीची किंमत ६७ रुपये आहे मग कामगारांना अशी कोणती थाळी दिली जातेय त्यात ६७ रुपयांचे जेवण आहे? इंडोअलायन कंपनीला जेवण बनवण्याचे कंत्राट दिले जाते त्यात शंकर जाधव,शिरिश सावंत,विवेक जाधव यांची नावे आहेत मागे चिक्की घोटाळ्यातील,जंरडेश्वर कारखान्यातील काही नावे आहेत असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.