अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२५ जुलै २३ मंगळवार
जिल्ह्यातील लोकसंख्या व क्षेत्रफळाने सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत कांडली सर्वस्तृत आहे.नगरपरिषद अचलपूर क्षेत्रातील परतवाडा शहराला लागून असलेल्या कांडलीमध्ये दिवसेंदिवस लेआऊटची वाढती संख्या बघता ग्रामपंचायतला प्राप्त होणा-या थोडक्या निधीने नागरिकांच्या पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे दरदिवशी घरे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना व वर्षानुवर्षापासून येथे वास्तव्यास असलेल्या लोकवस्त्या आजही पायाभूत सुविधेपासून वंचित आहे.सतरा ग्रामपंचायत सदस्यांचा डोलारा असलेल्या ग्राम पंचायतला शासन स्तरावरून प्राप्त होणाऱ्या अपु-या निधीमुळे नागरिकांच्या नेहमी रोशाला सामोरे जावे लागते.तर २०११ च्या जनगणने नुसार चौदा हजार नऊशे पंच्यांशी लोकसंख्या जरी असली तरी प्रत्यक्षात लोकसंख्या तीस हजारा जवळपास असल्याचे खात्रीने सांगता येईल.याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळेत पावले उचलून ग्राम पंचायत कांडलीला नगरपंचायतचा दर्जा मिळवून देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
गावाचे आता शहरी करणात रूपांतर झाले आहे तसेच कांडली मध्ये सुरू असलेली नवीन घरे बांधकामे लेआऊटची व्याप्ती बघता भविष्यात ग्रा.प. कडून लोकांच्या समस्या व अपेक्षा साहजिकच अपूर्ण राहील त्यामुळे कांडलीवाच्या सोयी सुविधांच्या दृष्टीने कांडली नगर पंचायतचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी नागरिकांच्या स्वाक्षरीने मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना या मागणीसाठी साकडे घालू अशी प्रतिक्रिया भ्रमणध्वनीद्वारे आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रितेश अवघड यांनी दिली आहे.
कांडली आता गाव राहिले कुठे?
कांडली गाव सर्वगुणसंपन्न असल्याने शहरात वास्तव्यास असलेले,आजूबाजूच्या गाव खेड्यात वास्तवात असलेल्या नागरिकांची कांडली भागात घरे बांधुन राहण्यासाठी पहिली पसंती ठरू लागली आहे त्याच प्रमाणे गावात सोनवणे महाविद्यालय,आकांक्षा कन्या शाळा,आदर्श विद्यालय, रामकृष्ण विद्यालय,कडू विद्यालय,भंसाली इंग्रजी शाळा,अनेक वस्तीगृहे,जि प मराठी-उर्दू शाळा,नगरांमध्ये प्री नर्सरी,नऊ अंगणवाड्यासह गजानन महाराज,साई बाबा,पार्वती मंदिर,गणपती मंदिर,बजरंग बली मंदिर यासारखे प्रसिद्ध आस्था स्थाने आहेत.तर जागोजागी कॉम्प्लेक्स, अपार्टमेंट उभी आहेत.मनोरंजनासाठी गोविंद टॉकीज ,मंगल कार्यालय असून यासह अनेक गरजांनी संपन्नता तसेच सर्वच प्रकारच्या सुविधा असल्याने गावाचे रूपांतर शहरात झाल्याचे आता मान्य करावेच लागते.