Just another WordPress site

या सरकारकडे स्वतःचे इंधन व ऊर्जा आहे की नाही? की दुसऱ्यांचे डबे लावूनच हे सरकार चालणार? संजय राऊत यांचा सवाल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ जुलै २३ बुधवार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांची आज मुलाखत प्रसिद्ध झाली असून त्यांनी त्यांच्या मुलाखतीत अनेक मुद्द्यावंर सविस्तर चर्चा केली आहे.तसेच ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही आता सरकारवर टीकास्र डागले आहे.राज्यात सध्या शिंदे-पवार-भाजपा असे ट्रिपल इंजिन सरकार आहे या ट्रिपल इंजिन सरकारवरूनच संजय राऊतांनी घणाघात केला आहे.संजय राऊतांनी आज प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना मणिपूरध्ये सुरू असलेल्या हिंसाचारप्रकरणीही केंद्र सरकारला धारेवर धरले आहे.मणिपूरचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे.उद्धव ठाकरेंनी मणिपूरविषयी चिंता व्यक्त केली.ज्या मणिपूरमध्ये कायद्याचे राज्य नाही,घटनेचे राज्य नाही,केंद्र सरकार ते आणू इच्छित नाही ते केंद्र सरकार कोणत्या तोंडाने समान नागरी कायदा आणणार असा त्यांचा (उद्धव ठाकरेंचा) प्रश्न आहे असे संजय राऊत म्हणाले.

गोवंश हत्याबंदीचा कायदा प्रत्येक राज्यात वेगळा लावत आहेत.प्रत्येक राज्यात तुमची भूमिका वेगळी आहे.राजकारणानुसार सोयीची भूमिका आहे.समान नागरी कायदा तुमच्या राजकीय फायद्याकरता का आणता आहात? असा सवालही राऊतांनी यावेळी विचारला आहे.भ्रष्टाचारा संदर्भात जे आपल्या पक्षात येतील त्यांना वेगळा कायदा,जे तुम्हाला विरोध करतील त्यांना वेगळा कायदा हे समान नागरी कायद्याचे लक्षण नाही. इथे आधी समान कायदा लावा मग समान नागरी कायदा आणा हे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मुलाखतीत परखडपणे सांगितले आहे असेही राऊत म्हणाले.राज्यात ट्रिपल इंजिन सरकार आहे.पूर्वी एक इंजिन होते मग डबल इंजिन झाले आता ट्रिपल इंजिन आहे अशा किती इंजिनावर सरकार चालणार आहे? या सरकारकडे स्वतःही ऊर्जा,स्वतःचे इंधन आहे की नाही? की दुसऱ्यांचे डबे लावूनच हे सरकार चालणार आहे? असा प्रश्नही राऊतांनी विचारला.

Leave A Reply

Your email address will not be published.