यावल तालुक्यातील घातक रसायनाची पन्नीची दारू व हातभट्टी गावठी दारू कायमची बंद करण्याबाबत सर्वपक्षीय शिष्ठ मंडळाचे पोलीसांना निवेदन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जुलै २३ बुधवार
शहरासह तालुक्यात मोठया प्रमाणावर सर्रासपणे बेकायद्याशीर विक्री होणाऱ्या गावठी हातभट्टी व पन्नीच्या दारूमुळे अनेक कुटुंब उद्धवस्थ झाले असुन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी प्रशासनाला दिलेल्या आदेशाला व आवाहनास पाठींबा देण्यासाठी यावल येथे सर्वपक्षीय पदाधिकारी एकवटून त्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांची भेट घेवुन विविध प्रकारच्या सार्वजनिक ठिकाणी दारूला कायमची बंदी करावी या संदर्भातील मागणीचे निवेदन नुकतेच देण्यात आले.
यावेळी सर्वपक्षीय शिष्ठ मंडळात भाजपाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी,यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती हर्षल गोविंदा पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,यावल नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादीचे प्रवक्ते अतुल वसंत पाटील, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तथा माजी कृउबाचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील,कृउबाचे माजी सभापती तथा संचालक नारायण चौधरी, भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे,तालुका सरसिटणीस विलास चौधरी,कृउबाचे संचालक उज्जैनसिंग राजपुत,मनसेचे जनहित विभागाचे प्रदेश पदधिकारी चेतन अढळकर,भाजपा ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज उर्फ बाळु फेगडे,शिवसेना (उबाठा) चे पप्पु जोशी,शकील पटेल,राष्ट्रवादीचे मोहसिन खान,भरत चौधरी,राजेश भावगी यांच्यासह सर्वपक्षीय पदधिकारी उपस्थित होते.यावेळी दिलेल्या निवेदनात सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी म्हटले आहे की,यावल तालुक्याची भौगोलिक रचना ही ग्रामीण भागाची असुन बहुतांश नागरीक हे शेतकरी आणि शेतमजुर आहेत.रोज कामावर जावुन हात मजुरीवर आपल्या कुटुंबाचा उदरनिवार्ह चालविणारे आहेत अशा परिस्थित यावल तालुक्यात सर्वत्र गावठी दारू व अत्यंत घातक रसायन टाकुन पन्नीची दारू तयार करून ती मोठया प्रमाणावर विक्री करण्यात येत असुन सहज मिळणाऱ्या या दारूच्या आहारी जावुन व्यसनाधिन होवुन वेग वेगळे आजार होवुन त्यांचे जिवन व कटुंबाचे संसार उद्धवस्त होत आहे तरी आपल्या पोलीस प्रशासनाच्या वतीने यावल तालुक्यात सर्वत्र राजरोजसपणे विक्री होणाऱ्या हातभट्टीची गावठी दारू व घातक रसायनची पन्नीची दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करीत कायमची ही विक्री बंद करावी अशी मागणी सदरील शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे .