Just another WordPress site

“ज्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल त्या दिवशी मी अमेरिकेत जाऊन बसणार”

संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारावर बच्चू कडू यांचे भाष्य

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार

महाविकास आघाडी कोसळल्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असून या घटनेला आता एक वर्षाहून अधिकचा काळ लोटला आहे तरीही शिंदे गटातील अनेक नेत्यांचा अद्याप मंत्रिमंडळात समावेश करून घेतला नाही.शिंदे गटाला मंत्रीमंडळ विस्ताराच्या नवनवीन तारखा दिल्या जात असतांना काही दिवसांपूर्वी अचानक अजित पवार गटाचा सत्तेत समावेश झाला यात काही महत्त्वाची मंत्रिपदे अजित पवार गटातील नेत्यांना देण्यात आली यामुळे शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा आहे अशी एकंदरीत राजकीय स्थिती असतांना राष्ट्रवादी काँग्रेसचा उर्वरित गटही सत्तेत सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा उर्वरित गट सत्तेत सहभागी झाल्यास त्या गटातील नेत्यांनाही राज्यमंत्रीपदे दिली जातील अशी चर्चा आहे तसेच १० ते १२ ऑगस्टदरम्यान मंत्रीमंडळ विस्तार होईल असे  विधान देवेंद्र फडणवीसांनी केले आहे.या सर्व घडामोडींवर आता शिंदे गटाचे समर्थक आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

माझे काय होईल? याची कुणीही चिंता करू नये.मी आमदार असो वा नसो किंवा मी मंत्री असो वा नसो याची मला काहीही चिंता नाही.मला मंत्रिपदाचे आश्वासन दिले होते परंतु आता मी स्वत: मंत्रीपद नाकारले आहे त्यामुळे तो विषय आता संपला आहे.त्याचबरोबर संभाव्य मंत्रीमंडळ विस्तारावर भाष्य करतांना बच्चू कडू म्हणाले कि,ज्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल त्या दिवशी मी अमेरिकेत जाऊन बसणार आहे अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.