Just another WordPress site

“मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल”

मोदींनी सूतोवाच केल्यानंतर 'भाजपाच्या ७५ वर्षांच्या नियमाचे काय होणार?' राजकीय वर्तुळात चर्चा

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार

२०१९ च्या निवडणुकांआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना तिकीट न दिले जाण्यावरून राजकीय चर्चेला उधाण आले होते यासंदर्भात भाजपावर व विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ज्येष्ठांना डावलल्याची टीका करण्यात आली होती मात्र हा पक्षाचा निर्णय असल्याचे भाजपाकडून तेव्हा सांगण्यात आले होते त्यामुळे भाजपामध्ये ७५ वर्षांनंतर राजकीय निवृत्तीचा पक्षसंकेत रूढ झाल्याचे दिसून येत आहे.अजित पवारांनीही बंडखोरीनंतर शरद पवारांना लक्ष्य करतांना भाजपाच्या याच नियमाचा दाखला दिला मात्र आता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच भाजपाच्या या पक्षसंकेतांना डावलून पुढे जाण्याचे अप्रत्यक्ष सूतोवाच दिल्याचे बोलले जात आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकांआधी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी यांना तिकीट नाकारण्यात आले होते यासंदर्भात टीका झाल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी एका पत्रकार परिषदेत बोलतांना म्हटले होते की,फक्त माध्यमांकडून यावर रान उठवले जात असून ७५ वर्षांच्या वरच्या कुणालाही तिकीट देण्यात आलेले नाही हा पक्षाचा निर्णय आहे असे सांगितले होते.२०१९मध्ये अमित शाह गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून निवडून आले त्यांच्याआधी तो मतदारसंघ लालकृष्ण अडवाणी यांचा होता.

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दरम्यान अजित पवारांनी २ जुलै रोजी बंडखोरी केल्यानंतर ५ जुलै रोजी आपल्या गटाच्या मेळाव्यात बोलतांना शरद पवारांना भाजपाचा हाच दाखला दिला होता.आता जर वय ८३ झाले तर तुम्ही कधी थांबणार आहात का? एखादा माणूस महाराष्ट्र सरकारमध्ये नोकरीमध्ये लागला तर ५८ व्या वर्षी रिटायर्ड होतो.IAS, IPS असेल तर ६० व्या वर्षी रिटायर्ड होतात राजकारणात असेल तर भाजपात ७५ व्या वर्षी रिटायर्ड केले जाते.मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण आडवाणी ही उदाहरणे आहेत असे अजित पवार म्हणाले होते.एकीकडे भाजपाच्या ‘पंचाहत्तरीनंतर तिकीट नाही’ या पक्षसंकेताची चर्चा असतांना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मात्र वेगळे सूतोवाच केले आहेत.काल दि.२६ जुलै बुधवार रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते दिल्लीच्या प्रगती मैदानावरील कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी मोदींनी बोलतांना  आपल्या पंतप्रधान म्हणून तिसऱ्या टर्मचा उल्लेख केला आहे.२०१४ व २०१९ असे दोन वेळा सलग पंतप्रदान नरेंद्र मोदीच भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते तसेच पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्येही नरेंद्र मोदीच भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार हे आता जवळपास निश्चित मानले जात आहे.या पार्श्वभूमीवर खुद्द मोदींनीही दिल्लीत बुधवारी तसेच सूतोवाच केल्यानंतर भाजपाच्या ७५ वर्षांच्या नियमाचे काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ही जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल ही मोदीची गॅरंटी आहे. आमच्या दुसऱ्या कार्यकाळात भारत जगातली पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था झाली पण माझ्या तिसऱ्या कार्यकाळात ती तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल.जनता त्यांची स्वप्नं त्यांच्या डोळ्यांसमोर पूर्ण होताना पाहू शकेल.आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाचा विकासरथ अधिक वेगाने धावेल असे मोदी या कार्यक्रमात म्हणाले आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या ७२ वर्षांचे आहेत.पुढील वर्षी निवडणुकांच्या काळात ते ७३ वर्षांचे असतील त्यामुळे भाजपाने या निवडणुका जिंकल्या आणि मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले तर ते ७८ वर्षांचे होईपर्यंत पंतप्रधानपदी राहतील त्यामुळे आता पंचाहत्तरीनंतरही पंतप्रधानपदीच राहण्याचे मोदींचे सूचोवाच नव्या राजकीय चर्चेसाठी कारणीभूत ठरले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.