Just another WordPress site

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा? वाद निवडणूक आयोगाकडे ! दोन्ही गटांना नोटीस,तीन आठवड्यांत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ जुलै २३
नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले आहेत.पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता.शरद पवार गटाने केलेल्या याचिकेची दखल घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला नोटीस पाठवली होती.आता अशीच नोटीस अजित पवार गटाच्या याचिकेची दखल घेत शरद पवार गटाला पाठवण्यात आली आहे त्यामुळे येत्या तीन आठवड्यांत पक्षांसदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत दि हिंदूने यासंदर्भातील वृत्त दिले आहे तसेच दोन्ही गटांनी एकमेकांना ही कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.दि हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्याने ही नोटीस आली असल्याचे मान्य केले आहे.अजित पवार गटाने विधानसभेतील सर्वाधिक संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे त्यावर उत्तर सादर करण्याबाबत नोटीस निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली आहे त्यांच्या दाव्यावर उत्तर देण्याचे आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत ही एक प्रक्रिया आहे.आम्हीही निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील याचिका केली होती तेव्हा अजित पवार गटालाही निवडणूक आयोगाने अशी नोटीस पाठवली होती असे या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे

आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आलेल्या याचिकांवर निर्णय घेण्याआधी निवडणूक आयोगाला आमचे उत्तर हवे आहे.आम्ही विहित कालावधित आमचे उत्तर निवडणूक आयोगाला देऊ असेही या वरिष्ठ नेत्याने सांगितले आहे.राज्याच्या विरोधी बाकावर असलेले अजित पवार यांनी २ जुलै रोजी सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्यासोबत अनेक आमदार असून त्यापैकी आठ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.दरम्यान ३० जून रोजी लिहिलेले एक पत्र निवडणूक आयोगाला ५ जुलै रोजी प्राप्त झाले आहे.या पत्रात राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.अध्यक्षपदाचा ठराव आणि ४० नेत्यांची शपथपत्रेही यावेळी सादर करण्यात आली होती.दरम्यान २ जुलै रोजी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लागलीच ३ जुलै रोजी शरद पवार गटाने विधानसभा अध्यक्षांकडे धाव घेतली होती.त्यानुसार अजित पवारांसह आठ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्बात अध्यक्षांना पत्र लिहिण्यात आले होते तर निवडणूक आयोगाने आधी शरद पवार गटाची सुनावणी घ्यावी असे कॅव्हेट जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे.अजित पवार आणि शरद पवार गट यांच्यातील पक्षांतर्गत वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहोचल्याने राष्ट्रवादी पक्ष कोणाचा यावर निर्णय होणार आहे याकरीता पक्षासंदर्भातील कागदपत्रे,शपथपत्र वगैरे दोन्ही गटांना सादर करावी लागणार आहेत.
Leave A Reply

Your email address will not be published.