Just another WordPress site

आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-आजकाल लहान मुले आपल्या आई-वडिलांकडे एक ना अनेक कारणांसाठी हट्ट करत असतात आणि या हट्टापायी ही मुले टोकाचे पाऊल देखील उचलत असतात.अशाच पद्धतीची एक घटना बारामती तालुक्यातील क-हावागज या गावात घडली आहे.आईने मोबाईल दिला नाही या कारणावरून नाराज झालेल्या एका शाळकरी मुलाने चक्क गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

     आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव शुभम मोतीराम धोत्रे असे आहे.शुभम हा अंजनगाव येथील सोमेश्वर महाविद्यालयात इयत्ता नववी मध्ये शिकत होता.शुभमला वडील नसल्याने आई एकटीच त्याचा सांभाळ करीत होती.घरची परिस्थिती गरिबीची असल्याने आई मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होती.मात्र शुभम आईकडे मोबाईल साठी हट्ट करत होता.आर्थिक परिस्थितीमुळे आईने मोबाईल घेऊन दिला नाही या कारणामुळे निराश झालेल्या शुभमने गळफास घेऊन आत्महत्या केली.शुभमने पत्र्याच्या शेडच्या अँगलला साडीच्या साह्याने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला.पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण अवसर यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण घटनेची माहिती घेतली. यापुढील अधिक तपास मालेगाव पोलीस करत आहेत.सदरील घटना गुरुवार रोजी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान मोबाईल न दिल्याच्या कारणामुळे शुभमने गळफास घेतल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.