अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सात पैकी सहा सांझातील कोतवाल संवर्गातील रिक्त पदासाठी आरक्षण सोडत दि.२५ जुलै रोजी काढण्यात आली.सदरील आरक्षण सोडतीचा कार्यक्रम निवड समितीच्या उपस्थितीत अंजनगाव तहसील कार्यालय येथे नुकताच पार पडला.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
शासनाच्या नियमानुसार ८० टक्के सांझातील आरक्षण जाहीर असल्याने सात सांझापैकी सहा सांझातील गावाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून लाखनवाडी इमाव तर कारला अराखीव कोतवाल पद हे महिलांसाठी राखीव असणार आहे तर विहिगाव भज-ड,बोरगाव,अंबाडा इमाव (सर्वसाधारण) सुर्जी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच कुंभारगाव अराखीव सर्वसाधारणसाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.दरम्यान २७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत उमेदवारांनी भरलेला अर्ज तहसील कार्यालय अंजनगाव सुर्जी येथे सादर करावयाचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.