अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे काल दि.२६ जुलै बुधवार रोजी प्रधानमंत्री पीक विमा योजनेची व्यापक जनजागृती व्हावी तसेच या योजनेची माहिती तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचावी यासाठी विमा कंपनीर्ते चित्ररथ उपलब्ध करुन देण्यात आला असून या पाश्वभूमीवर अंजनगाव येथे सोमवार २४ जुलै रोजी या चित्ररथाला अंजनगाव सुर्जीचे प्रभारी तहसीलदार रवींद्र काळे यांनी हिरवी झेंडी दाखवून चित्ररथाला मार्गस्थ करण्यात आले.सदरहू काळ अंजनगाव सुर्जी येथे या चित्ररथाचे जोरदार स्वागत करण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
यावेळी प्रचार,प्रसिद्धी साहित्याचेही अनावरण करण्यात आले तसेच पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रभारी तहसीलदार रवींद्र काळे यांनी यावेळी बोलतांना केले.हवामानाच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविण्यात येत आहे.पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधित स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणाया नुकसानामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट होते अशावेळी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमुळे विमा संरक्षणाचे कवच आहे.पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना प्रति अर्ज केवळ ‘एक रुपया’ भरुन नोंदणी करावयाची आहे.प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत सहभागी होण्यासाठी शेतकरी बांधवांना सीएससी सेंटर,बँक किंवा पोस्ट ऑफीसमध्ये नोंदणी करता येणार आहे.यावर्षी या योजनेची अंमलबजावणी अमरावती जिल्ह्यामध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या माध्यमातून होणार आहे.यावेळी प्रभारी तालुका कृषी अधिकारी आर.तराळे,पंचायत गटविकास अधिकारी विनोद खेडकर,नायब तहसीलदार विजय भगत,पं.स.कृषी अधिकारी राठोड,मंडळ कृषी अधिकारी खेरडे तसेच पीक विमा प्रतिनिधी अमरदीप कुकडे,तालुका पीक विमा प्रतिनिधी सुबोध धारस्कर व इतर कर्मचारी तसेच शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.