यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार
येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस आज दि.२७ जुलै गुरुवार रोजी विविध सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
यावल येथील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यावल शहर व तालुकाच्या वतीने शहरात शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस निमित्ताने शिवसेना (उबाठा)च्या वतीने येथील बाल संस्कार विद्या मंदिर,सीताबाई दामोदर देवकर लिटिल फ्लॉवर बालवाडी, तारकेश्वर विद्या मंदिर,इंदिरा गांधी उर्दू बालवाडी,माळी यांची स्कूल तसेच विविध शाळा मध्ये लहान बालवाडीत असलेल्या विद्यार्थ्यांना बिस्कीट, चॉकलेट खाऊ वाटप करण्यात येवुन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यात येवून दीर्घायुष्यसाठी आई जगदंबा चरणी प्रार्थना करण्यात आली.यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी,शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,शहर उपप्रमुख संतोष धोबी,शहर उपप्रमुख योगेश चौधरी,तालुका उपप्रमुख शरद कोळी,तालुका संघटक पप्पू जोशी,शहर उपप्रमुख निलेश पाराशर,विभाग प्रमुख प्रविण लोणारी,आदिवासी सेनेचे तालुका प्रमुख हुसेन तडवी,अल्पसंख्यांक आघाडीचे अजहर खाटीक,युवासेनेचे सरचिटणीस विजय पंडित,डॉ.विवेक अडकमोल,प्रसिध्दी प्रमुख संतोष वाघ,आर.के.चौधरी सर,पिंटू भाऊ कुंभार,सुरेश कुंभार,गौरव जोशी,मयूर खर्चे व इतर शिवसैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमांना उपस्थित होते.