नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२७ जुलै २३ गुरुवार
कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात मानवाच्या पुनर्जन्माबाबत विधान केले असून त्यांनी यापूर्वी आंबे खाल्ल्याने मुले होतात असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.पुन्हा संभाजी यांनी नवीन अजब असे वक्तव्य केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवसाहेब ठाकरे
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या नागपूर विभागाने सुभाष रोड,गीता मंदिर येथे काल बुधवारी कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी संभाजी भिडे यांनी पुनर्जन्माबाबत भाष्य केले असून पती आपल्या पत्नीच्या पोटातून मुलाच्या रुपाने जन्माला येतो तसेच एखादी महिला आपल्या मुलीच्या रुपाने स्वत: जन्म घेत असते असे वक्तव्य करीत ते पुन्हा चर्चेत आले आहे.