Just another WordPress site

“चिन्ह राहिले नाही तरी….चिन्हापेक्षा विचार महत्वाचे”-‘खरी राष्ट्रवादी कोणाची’ वरून रोहित पवार यांचे स्पष्ट मत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२८ जुलै २३ शुक्रवार

अजित पवारांसह काही आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असून यानंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा मुद्दा उपस्थित झाला आहे.यावरून निवडणूक आयोगाने दि.२६ जुलै बुधवार रोजी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीला नोटीस बजावली असून अजित पवार यांच्या गटाने दाखल केलेल्या याचिकेवर ही नोटीस बजावण्यात आली आहे यावर आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांनाम्हटले आहे की,गेल्या काही वर्षात निवडणूक आयोग सत्तेतील लोकांची बाजू घेते असे मत सामान्य लोकांचे झाले आहे.निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असून ती एक प्रक्रिया आहे ती पूर्ण करत असतांना दोन्ही बाजुचे गट ताकद लावतील आणि युक्तीवादही होईल.

परंतु निवडणूक आयोग कोणाच्या बाजुने निर्णय देईल याचा अंदाज सर्वांना आहे.आम्ही न्यायालयात जात लढाई लढू पण येत्या काळात लढत असतांना चिन्ह राहिले नाही तरी लोकांनाच विचारावे शरद पवार यांना कोणते चिन्ह मिळाले पाहिजे ते चिन्ह मिळाल्यानंतर लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जावे लागणार याचा अंदाज आला आहे त्यामुळे चिन्हापेक्षा विचार महत्वाचे आहेत तसेच शरद पवार यांच्या बरोबर राहून लढतोय हे आमच्यासाठी महत्वाचे आहे असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.