“करमचंद गांधी हे मोहनदास(महात्मा गांधी)यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत”-संभाजी भिडे यांचे खळबळजनक वक्तव्य
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
देशामध्ये सर्वधर्मसमभावाचा उपदेश नकोच अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करावे असे आवाहन संभाजी भिडे यांनी केले.हिंदुस्थान हा जगाच्या पाठीवरील एकमात्र हिंदू बहुसंख्य देश आहे.हिंदूंचे शौर्य अफाट आहे परंतु हिंदू स्वतःचा धर्म,कर्तव्य, जबाबदाऱ्या विसरला.हिंदुस्थानची फाळणी होऊन देश षंढ पुढाऱ्यांच्या हाती गेला आणि हिंदूंची व हिंदुस्थानची अधोगती झाली असे ते म्हणाले. कार्यक्रमापूर्वी भीम आर्मी,भीम ब्रिगेड आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रम स्थळाजवळ संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन केले तर काही ठिकाणचे पोस्टरही फाडण्यात आले याप्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.