Just another WordPress site

२०१९ ते २०२१ पर्यंत देशभरात १० लाखांहून अधिक महिला बेपत्ता

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रतून सर्वाधिक मुली आणि महिला बेपत्ता-नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB)

ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक

महाराष्ट्र प्रदेश (प्रतिनिधी) :-

दि.२८ जुलै २३ शुक्रवार

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) ने प्रसिद्ध केलेल्या अहवालात भारतात बेपत्ता झालेल्या महिला आणि मुलींच्या संख्येची आकडेवारी नुकतीच जाहीर केली आहे.एनसीआरबीच्या आकडेवारीचा हवाला देऊन केंद्रीय गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार २०२१ मध्ये देशभरातून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ३,७५,०५८ महिला बेपत्ता झाल्या आहेत.२०१९ ते २०२१ पर्यंत देशभरातून एकूण १०,६१,६४८ महिला बेपत्ता झाल्या आहेत.मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही दोन राज्ये आहेत जिथून २०१९ ते २०२१ पर्यंत सर्वाधिक मुली आणि महिला गायब झाल्या आहेत.मध्य प्रदेशातून २०१९ मध्ये ५२,११९,२०२० मध्ये ५२३५७ आणि २०२१ मध्ये ५५,७०४ स्त्रिया बेपत्ता झाल्या जे अस्वस्थ वाढीचा कल दर्शविते.

महाराष्ट्रात २०१९ मध्ये ६३,१६७,२०२० मध्ये ५८,७३५ आणि २०२१ मध्ये ५६,४९८ महिला बेपत्ता झाल्या तथापि त्यामध्ये घट दिसून येत आहे. २०२१ मध्ये एकूण ९०,११३ मुली (ज्या १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या आहेत) गायब झाल्या असून पश्चिम बंगालमधून सर्वाधिक १३,२७८ मुली आहेत. २०१९ ते २०२१ पर्यंत देशभरातून एकूण १०,६१,६४८ महिला बेपत्ता झाल्या आहेत त्याचबरोबर याच कालावधीत २,५१,४३० मुली गायब झाल्या आहेत.यावर भाष्य करतांना गृह मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,महिलांवरील गुन्ह्यांचा तपास आणि खटला चालवणे यासह कायदा व सुव्यवस्था राखणे ही संबंधित राज्य सरकारांची जबाबदारी आहे.त्यात लैंगिक गुन्ह्यांविरुद्ध प्रभावी कारवाईसाठी फौजदारी कायदा (सुधारणा) कायदा,२०१३ लागू करण्यासह महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्राने घेतलेल्या पुढाकारांची संख्या नमूद केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.