Just another WordPress site

सीबीआय कोर्टाकडून छोटा राजनची निर्दोष मुक्तता : दत्ता सामंत हत्याप्रकरण

ॲड.आनंद महाजन,पोलीस नायक

महाराष्ट्र प्रदेश (प्रतिनिधी) :-

दि.२९ जुलै २३ शनिवार

१९९७ मध्ये कामगार संघटनेच्या नेत्याच्या हत्येचा कट रचला होता हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नसल्या कारणाने सीबीआय कोर्टाकडून छोटा राजनची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.ट्रेड युनियनचे नेते दत्ता सामंत यांच्या १९९७ मध्ये झालेल्या हत्येशी संबंधित गुंड छोटा राजन या गुंडाची विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) न्यायालयाने काल दि.२८ जुलै शुक्रवार रोजी पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.छोटा राजनचे खरे नाव राजेंद्र सदाशिव निकाळजे असून त्यानेच हा कट रचल्याचे सिद्ध करणारे काहीही रेकॉर्डवर नसल्याचे विशेष न्यायाधीश बी.डी.शेळके यांनी निकालात सांगितले आहे.सदरील प्रकरणातील प्रमुख साक्षीदार साक्ष देताना फितूर झाले ते फिर्यादीच्या खटल्याला समर्थन देत नाहीत तसेच आरोपींवरील आरोप सिद्ध करण्यासाठी इतर साक्षीदारांची साक्ष पुरेशी नाही.राजनने कट रचला हे सिद्ध करण्यासाठी रेकॉर्डवर काहीही नाही असे निकालात म्हटले आहे.

निर्दोष सुटल्यानंतरही या गुंडाची तुरुंगातून सुटका होणार नाही कारण त्याच्यावर विविध शहरांमध्ये अनेक प्रलंबित खटले सुरू आहेत.२०११ मध्ये पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरल्यानंतर २०१८ मध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.दत्ता सामंत ज्यांनी १९८१ मध्ये मुंबईत कापड गिरणी कामगारांचा संप आयोजित केला होता त्यांची १६ जानेवारी १९९७ रोजी घाटकोपर उपनगरातील पंत नगर येथील त्यांच्या कार्यालयात जीपमधून जात असतांना गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.हल्लेखोर मोटारसायकलवरून आले आणि त्यांनी १७ राऊंड गोळीबार केला होता यावेळी राजनने हत्येचा कट रचल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला होता.खटल्याच्या पहिल्या टप्प्यात जुलै २००० मध्ये निर्णय सुनावण्यात आला ज्यामध्ये राजन व त्याचा विश्वासू सहकारी रोहित वर्मा आणि गुंड गुरु साटम यांना फरार आरोपी म्हणून दाखवण्यात आले आणि त्यांचा खटला वेगळा करण्यात आला.सुमारे दोन दशकांपासून फरार असलेल्या राजनला इंडोनेशियाच्या पोलिसांनी इंटरपोलच्या रेड नोटीसच्या आधारे बाली येथे ताब्यात घेतले आणि भारतात पाठवले आणि २०१५ मध्ये अटक करण्यात आली तो सध्या तिहार तुरुंगात आहे.छोटा राजन विरुद्ध ७१ प्रकरणे महाराष्ट्र सरकारच्या संदर्भावर सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.