Just another WordPress site

“संभाजी भिडे यांचे वक्तव्य सरकार तपासेल व त्यावर सरकारला वाटेल तो निर्णय घेतला जाईल”

विरोधकांच्या दोषारोपावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिउत्तर

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२९ जुलै २३ शनिवार

महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे सांगितले जाते परंतु करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी नुकतेच केले आहे.संभाजी भिडेंच्या या वक्तव्यावरून राज्यातले वातावरण तापलेअसून संभाजी भिडे यांच्या वक्तव्यामुळे काल दि.२८ जुलै शुक्रवार रोजी विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संभाजी भिडे हे भाजपाचे पिल्लू असल्याचे म्हटले आहे.यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.बावनकुळे म्हणाले की,संभाजी भिंडे यांचे जे काही वादग्रस्त वक्तव्य असेल ते सरकार तपासून बघेल.संभांजी भिडेंचा आणि आमचा संबंध नाही.संभाजी भिडे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते थोडी आहेत त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले असेल तर ते सरकार तपासेल त्यावर सरकारला वाटेल तो निर्णय घेतला जाईल.

दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा विषय काल विधानसभेत मांडला यावेळी पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की,संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले असून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांना कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे.संभाजी भिडे हे अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत आहेत यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले की,पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन राज्य सरकारने उचित कारवाई करावी.दुसऱ्या बाजूला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनीदेखील संभाजी भिडेंच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला यावेळी थोरात म्हणाले की, संभाजी भिडे ही एक विकृती आहे त्यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत अवमानकारण वक्तव्य केले असून जे देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे  आहे.संभाजी भिडे वारंवार अशी वादग्रस्त वक्तव्ये करत असून त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचा शोध घेणे आवश्यक आहे.संभाजी भिडे यांचा हेतू महाराष्ट्राचे राजकीय आणि सामाजिक वातावरण अस्थिर करण्याचा आहे हे सरकारने ओळखले पाहिजे.

Leave A Reply

Your email address will not be published.