“संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही तर आम्ही आंदोलन छेडू”-यशोमती ठाकूर यांचा सरकारला इशारा
शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला असून हा विषय विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला.महाविकास आघाडीतील नेत्यांनी भिडेंच्या वक्तव्यावर गंभीर आक्षेप घेत त्यांच्या अटकेची मागणी केली यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस संभाजी भिडेंना फाशी देणार का? असा सवाल केला आहे.नाना पटोले म्हणाले,राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात सांगितले होते की, महापुरुषांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्यांच्या केवळ मुसक्या न बांधता त्यांना रस्त्यावर फाशी द्यावी असे त्यांचे मत आहे.आता आमचा सवाल आहे की देवेंद्र फडणवीस संभाजी भिडेंना फाशी देणार का?
???????????????? डोंगर कठोरा गावातील तलाठी लोकसेवक मन मिळाऊ स्वभाव व कामात तत्पर राहणारे आमचे मित्र वसीम तडवी यांचा आज दि.३० जुलै वाढदिवस ????????????????त्यानिमित्ताने पोलीस नायक परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ???????????????? शुभेच्छुक :- श्री.बाळासाहेब आढाळे,पोलीस नायक मुख्य संपादक (महाराष्ट्र राज्य)……………
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या,आम्ही आंदोलन केले तर आम्हाला अटक करायला हे तयार आहेत मात्र ज्याला देशातून तडीपार केले पाहिजे त्या नालायक माणसाला द्वेषपूर्ण भाषण देण्याची मुभा आहे हे कोणते राजकारण आहे आणि हा शासन चालवण्याचा कोणता प्रकार आहे.तसेच आम्ही ३० जुलै रविवारपर्यंत शांत बसू तोपर्यंत संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन अटक झाली नाही तर आम्ही आंदोलन छेडू तेव्हा ते आम्हाला थांबवू शकणार नाहीत असा इशारा यशोमती ठाकूर यांनी सरकारला दिला आहे.
संजय शिरसाट म्हणाले,संभाजी भिडेंनी अशी वादग्रस्त वक्तव्ये करू नये असे माझेही मत असून ते दरवेळी काही तरी वादग्रस्त वक्तव्य करतात.माझ्या शेतातली आंबे खा म्हणजे पोर होतात हा कोणता तर्क आहे असे बोलणे योग्य नाही.संभाजी भिडेंचा कुणी सन्मान करत असेल तर याचा अर्थ तोंडात येईल ते बोलणे योग्य नाही मीही त्यांचा निषेध करतो.तसेच मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही सांगणार आहे की,अशी वारंवार वक्तव्ये करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांवर एकदा तरी कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी संजय शिरसाटांनी केली आहे.
नाना पटोलेंच्या टीकेवर बोलतांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,नाना पटोलेंनी जरा अभ्यास करून बोलले पाहिजे. संभाजी भिडे वेगळे व्यक्तिमत्त्व आहे ते भाजपाचे प्राथमिक सदस्यही नाहीत आणि कुठल्याही पदावरही नाही त्यामुळे संभाजी भिडेंचा संबंध भाजपाशी जोडणे योग्य नाही.तसेच संभाजी भिडेंनी जे वक्तव्य केले आहे त्याची चौकशी करणे सरकारची जबाबदारी आहे त्या वक्तव्याचा काही विपर्यास झाला आहे का त्याची सरकार चौकशी करेल आणि योग्य विचार करेल असे मत बावनकुळेंनी व्यक्त केले आहे.