Just another WordPress site

“मी तुमच्यासारख्या माझ्या हिंदू लोकांसमोर नक्की झुकेल परंतु मी हुकूमशाहीपुढे कधीही झुकणार नाही”-उद्धव ठाकरे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३० जुलै २३ रविवार

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली असून आपल्यातील काही लोक गळ्यात पट्टा बांधून तिकडे गेले आहेत अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा समाचार घेतला तसेच पक्षफुटीवर भाष्य करतांना ठाकरे म्हणाले की,आम्ही अर्ध्या रात्री लपून-छपून तुमच्यासारख्या बैठका घेतल्या नाहीत व आम्ही दिवसाढवळ्या काँग्रेसबरोबर गेलो होतो असे ठाकरे यांनी ठाण्यात हिंदी भाषक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात म्हटले आहे.यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले,तुम्ही म्हणता मी काँग्रेसबरोबर गेलो होतो होय मी काँग्रेसबरोबर गेलो होतो पण खुलेआम (दिवसाढवळ्या) गेलो होतो मी तुमच्यासारख अर्ध्या रात्री लपून-छपून बैठका घेतल्या नव्हत्या पण मी भाजपाला एक प्रश्न विचारू इच्छितो की,आम्हाला काँग्रेसबरोबर जाण्यास मजबूर कुणी केले ? भाजपाबरोबर आम्ही २५ वर्षे होतो ही जगातील एकमेव युती असेल जी इतकी वर्षे हिंदुत्वासाठी मजबूतीने एकत्र राहिली ही युती सगळ्यात आधी कुणी तोडली असेल तर ती भाजपानेच तोडली.

???????????????? डोंगर कठोरा गावातील तलाठी लोकसेवक मन मिळाऊ स्वभाव व कामात तत्पर राहणारे आमचे मित्र वसीम तडवी यांचा आज दि.३० जुलै वाढदिवस ????????????????त्यानिमित्ताने पोलीस नायक परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ???????????????? शुभेच्छुक :- श्री.बाळासाहेब आढाळे,पोलीस नायक मुख्य संपादक (महाराष्ट्र राज्य)……………

आता आपल्यातील काही लोक गळ्यात पट्टा बांधून तिकडे गेले आहेत तसा पट्टा माझ्या गळ्यात बांधणारा अजून कुणी पैदा (जन्मला) झाला नाही आणि तो होणारही नाही कारण माझ्या नसांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे रक्त वाहत आहे.मी कधीही लाचार किंवा गुलाम बनणार नाही.मी तुमच्यासारख्या माझ्या हिंदू लोकांसमोर नक्की झुकेल परंतु मी हुकूमशाहीपुढे कधीही झुकणार नाही.मी हुकूमशाही कधीही मान्य करणार नाही असेही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला ठणकावून सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.