“संभाजी भिडे गुरुजींचा अपमान आम्हाला अजिबात सहन होणार नाही”-भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे वक्तव्य
अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३० जुलै २३ रविवार
समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे भारत माता की जय म्हणणार नाही असे जाहीरपणे बोलतात,नबाब मलिक देखील कोण आहेत हे सर्वांना ठाऊक आहे परंतु या दोघांबद्दल आमदार यशोमती ठाकूर यांचे तोंड बंद असते.मात्र संभाजी भिडे गुरुजींचा त्या अपमान करतात हे आम्हाला अजिबात सहन होणार नाही असे भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि खासदार डॉ.अनिल बोंडे पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.
संभाजी भिडे गुरुजींचा भाजपशी कुठलाही संबंध नाही मात्र एक हिंदू व्यक्ती म्हणून मी त्यांच्या पाठीशी असल्याचे डॉ.अनिल बोंडे म्हणाले. यशोमती ठाकूर यांनी भिडे गुरुजींना हरामखोर,नालायक असे म्हटले आहे.यशोमती ठाकूर यांना भिडे गुरुजींवर अशा शब्दात बोलण्याचा कुठलाही अधिकार नसून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा अशी आमची मागणी असल्याचे डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.भिडे गुरुजींना शिव्या देऊन यशोमती ठाकूर यांनी शेकडो युवकांच्या भावना भडकवल्या असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हायलाच हवा असे अनिल बोंडे म्हणाले.