अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.३१ जुलै २३ सोमवार
जिल्ह्यातील (बडनेरा) नवी वस्ती परिसरात असलेल्या बसस्थानकापासून दुर्गापूर रस्त्यावर गेल्या बारा ते तेरा रहिवासी वस्त्या असून या रस्त्यावरून रेल्वे धक्क्यावर ये जा करण्यासाठी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते.सदरील रस्त्याची वाहन क्षमता कमी असून ट्रक सारखे अवजडवाहने या रस्त्यावरून वाहतूक करीत असल्यामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे.परिणामी परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना व वयोवृद्ध महिला पुरुषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन देखील याकडे दुर्लक्षच केले जात आहे.तरी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता संबंधित रहिवाशांच्या वतीने नुकतेच रस्ता आंदोलन करण्यात आले व रेल्वे प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्ह्यातील (बडनेरा) नवी वस्ती परिसरातील बसस्थानकापासून दुर्गापूर रस्त्यावर बारा ते तेरा रहिवासी वस्त्या आहेत या रस्त्यावरून रेल्वे धक्क्यावर ये जा करणारे जवळपास २४० वाहने वाहतूक करतात.सदरील रस्त्याची वाहन क्षमता कमी असल्यामुळे ट्रक सारखे जडवाहने या रस्त्यावरून वाहतूक करीत असल्यामुळे रस्त्याची पूर्णपणे चाळण झालेली आहे.त्यामुळे या परिसरातील नागरिकांना विद्यार्थ्यांना व वयोवृद्ध महिला पुरुषांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.यासंदर्भात या परिसरातील नागरिकांनी रेल्वे प्रशासनाला निवेदन देऊन सात दिवसात रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली होती मात्र संबंधितांना अल्टिमेट देऊनही रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यामुळे शेकडो नागरिक आक्रमक होऊन त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले व या रस्त्यावरील वाहतूक थांबवली.यादरम्यान वाहतूक नियंत्रण करण्यासाठी मोठा पोलीस फोर्स फाटा जमला होता.रेल्वे माल धक्क्याला पर्यायी रस्ता असतांना सुद्धा या रस्त्याने वाहतूक होते असा प्रति प्रश्न नागरिकांचा होता.आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून अनेकदा या रस्त्याचे काम केले आहे मात्र या रस्त्यावरील वाहतूक सुरू असल्यामुळे या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.सदरील रस्ता रोको आंदोलनादरम्यान स्वाभिमानी पक्षाचे कार्याध्यक्ष अजय जयस्वाल,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद गवळी व प्राध्यापक अमोल मिलके यांनी पुढाकार घेतला.