Just another WordPress site

जुळ्या शहरात मुख्य रस्त्यालगत पार्किंग समस्येवर शिवसेना आक्रमक;तालुका संघटक भुषण नागे यांचे मुख्याधिकारी यांना निवेदन

अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-

दि.२ ऑगस्ट २३ बुधवार

जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा जुळ्या नगरीतील ‘अ’ दर्जाच्या नगरपरिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगत पार्किंगची व्यवस्थाच नसल्याने ग्राहकांना प्रचंड त्रास होत असुन रहदारीस अडथळा निर्माण होत आहे.या विषयावर आता शिवसेना आक्रमक झाली असून ही समस्या कायमची निकाली काढण्यात यावी याकरिता शिवसेनेचे अचलपूर तालुका संघटक भुषण नागे यांच्या वतीने नुकतेच नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,दुकाने,मॉल व्यापारी संकुल व इतर व्यावसायिक बांधकाम धारकांनी आपल्या आस्थापना समोरील बाजूस ग्राहक व अन्य नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा सोडणे शासन नियमानुसार बंधनकारक होते परंतु दुर्दैवाने शहरात असे कुठेही दिसून येत नाही आणि यावर नगरपालिका अचलपूर मार्फत कोणतीही कारवाई झाल्याचे किंवा कारवाई होतांना आढळून येत नाही या प्रशासकीय चुकीमुळे नागरिक वेठिस धरले जात आहे.पार्किंग नसल्यामुळे नागरिकांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागते त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होते व अपघात घडतात तसेच रस्त्यावरील वाहनांना वाहतूक पोलीस विभागामार्फत ऑनलाइन दंड दिला जातो व दंड आकारल्यामुळे त्यांना या समस्येची आर्थिक झळ सुद्धा पोहोचत आहे.सदर व्यापारी संकुल,बॅंक,हॉस्पिटल धारक जेव्हा बांधकाम सुरू करतात तेव्हा संबंधित अधिकारी अभियंता यांनी जर वेळेवर बांधकाम ठिकाणी जाऊन संबंधितावर नियमानुसार पार्किंगची जागा सोडायला लावली असती किंवा त्याच्यावर कारवाई केली असती तर आज शहरात पार्किंगची समस्या नागरीकांना झाली नसती मात्र संबंधित अधिकारी व अभियंता यांनी आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही.

तरी आपण या गंभीर समस्येचा सकारात्मक विचार करून आठ दिवसांत दोषी व्यापारी संकुल व बॅंक,हॉस्पिटल धारकांना नियमानुसार पार्किंग जागा सोडण्याचे आदेश द्यावे व बांधकाम करतांना नियमानुसार पार्किंगची व्यवस्था न करणा-यांवर कायदेशीर कार्यवाही न करणारे आपल्या कार्यालयातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांची प्रशासकीय चौकशी लावुन योग्य ती कारवाई करावी.जेणेकरून नागरिकांच्या असुरक्षिततेला अंकुश बसेल येत्या ८ दिवसात आपल्या मार्फत या लोकहितार्थ समस्येवर उपाययोजना न झाल्यास आम्हाला नाईलाजास्तव आपल्या वरिष्ठांकडे दाद मागावी लागेल व वेळ उद्भवल्यास आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.यावेळी विवेक महल्ले तालुका प्रमुख,सागर डांगे उपतालुकाप्रमुख,सुभाष घुटे तालुका प्रमुख कामगार सेना,अमित ठाकरे उपतालुकाप्रमुख,अभय गोवारे,किशोर काठोळे,अंकुश वाघ,पंकज पर्वतकर,रीतेश कोठाळे व शिवसैनिक उपस्थित होते.

अचलपूर नगरपालिका अ दर्जाची असुन सुद्धा शहरात वाहन उभे करायला पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे दर दिवशी नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागतो. तसेच वाहतूक पोलिसांच्या चलान द्वारे आर्थिक भुर्दंडही बसतो. यावर वेळीच न. प. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उपाय योजना केली असती तर नागरिकांना या समस्येचा सामना करावा लागला नसता. परंतु भ्रष्टाचारात लुप्त असलेल्या अधिकाऱ्यांनी आपले पितळ उघडे पडू नये यासाठी न. प. कार्यालयामध्ये थम मशीन,सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बसविले नाही. अशी प्रतिक्रिया शिवसेना अचलपूर तालुका संघटक भूषण नागे यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.