यावल-पोलिस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोड येथील खुनाच्या गुन्यातील आरोपी महिला व दोन पुरुष अशा तिघांना आज सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.तर मनोज भंगाळे या तरुणाच्या खुनाला काही तास उलटत नाही तोच खुन्यातील आरोपींचा छडा लावून त्यांच्यावर कारवाई केली त्याबद्दल यावल पोलिसांच्या या स्तुत्य कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,तालुक्यातील चितोड येथील रहिवाशी मनोज संतोष भंगाळे वय ३६ या तरुणांकडून येथीलच महिला कल्पना शशिकांत पाटील हिने काही दिवसांपूर्वी ४ लाख उसनवार घेतले होते.या सन्वरीच्या पैसे मागणीवरून मनोज भंगाळे व कल्पना पाटील यांच्यात वाद होत होता.मनोज भंगाळे सन्वरीचे पैसे वारंवार मागतो याचा राग अनावर झाल्याने सदरील महिलेने देवानंद बाळु कोळी रा.यावल ह.मु.चितोड व मितेश ऊर्फ मिग्नेश भरतसिंग बारेला यांच्यासह अन्य अज्ञात संशयित मारेकऱ्यांचा सहाय्याने मनोज भंगाळे यांचा दि.२१रविवार रोजी खून केला होता.याप्रकरणी यावल पोलिसांनी तीन आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायाधीश एम.एस.बनचरेयांनी तिघे आरोपींना सोमवार दि.२९ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच विभागीय पोलीस अधीक्षक कुणाल कुमार यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या दिशादर्शनानुसार पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले,सुनीता कोळपकर,पोहेका.सिकंदर तडवी,मुझफ्फर खान,असलं खान,सुशील घुगे,महेंद्र ठाकरे,संदीप सुर्यवंशी यांनी केलेल्या स्तुत्य कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.तसेच या गुन्ह्यात आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.