Just another WordPress site

अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा स्थापित करण्याकरिता आमदार रवी राणा यांचे अभिवचन

अमरावती-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२ ऑगस्ट २३ बुधवार

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा सन्मानाने स्थापित व्हावा यासाठी पुढाकार घेवून सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आमदार रवीभाऊ राणा यांनी अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना अभिवचन दिले आहे.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जुनी वस्ती बडनेरा,चवरे नगर,माताखिडकी,बेलपुरा,आनंद नगर,गांधीआश्रम आदी विविध भागात जावून लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करून तमाम अनुयायांना महापुरुष अण्णाभाऊ साठे जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.यानिमित्त आयोजित भव्य रॅलीत आमदार रवीभाऊ राणा यांनी सहभाग नोंदविला हे विशेष!

यावेळी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी श्रमजीवी कष्टकरी दुर्लक्षित उपेक्षित घटकांसाठी केलेले कार्य अत्यंत मोलाचे असून त्यांचे साहित्य हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करून नव्याने जीवन जगण्याची प्रेरणा देते व मातंग समाजाच्या उत्थानासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आमदार रवीभाऊ राणा यांनी यावेळी सांगितले.प्रसंगी गणेशदासजी गायकवाड़,अनुप खडसे,अजय जैस्वाल,डॉ.रुपेश खड़से,रवि वानखड़े,विलास वाड़ेक़र,गजानन शेंन्द्रे,गोपालदास प्रधान,अजय मोरया,पंकज जाधव,अशोक चव्हान,संगीता कलाने,लता गायकवाड,ज्योति वानखड़े,अरुणा खड़से,चित्रा हनोते,अश्विनी कलाने,प्रतिमा कलाने,रत्ना गाड़ेकर, पर्वताबाई बनके,आकाश भाऊ खडसे,अनुपभाऊ खडसे,गोपाल गवई,कृष्णा भोगे,सागर महाजन,प्रवीण स्वर्गीय,आदित्य काटे,कार्तिक वाघमारे,गौरव अंभोरे,भूषण इंगळे,ऋषी वानखडे,उमेश डोंगरे,विकी वानखडे,गोलू गवळी,शाम वानखडे,कैलास वानखडे,विकी डोंगरे,विकास खडसे,मोनटी सगळे,सुजल वानखडे,सागरभाऊ कलाने,राजु कलाने आदींसह हजारो नागरिक उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.