नॅशनल अँटी करप्शन क्राईम अँड कंट्रोल ब्युरोने दिलेल्या निवेदनाची मुख्याधिकाऱ्यांकडून तात्काळ दखल
पत्रकार अनिल गौर यांच्या प्रयत्नांना यश;नागरी समस्या सोडविण्याचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन नागरिकांच्या विविध समस्यांचे लवकरच निवारण.
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.३ ऑगस्ट २३ गुरुवार
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरातील सुर्जी परिसरातील सती माता मंदिरासमोरील ते आठवडे बाजारापर्यंत नदीतील बांधण्यात आलेल्या नविन पुलाचे बांधकाम गेल्या दिड वर्षापासून झाले असून पुलाचे दोन्ही साईडचे रस्त्याचे काम (अपूर्ण) रखडलेले आहे.सदरहू पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता खराब झाला असून तेथे पावसाच्या पाण्यामुळे पाणी साचत आहे तसेच मोठे-मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जाण्या-येण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे परिणामी येथे दुचाकी वाहन व पायदळ चालणाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहेत सदरील त्रासामुळे नागरिकांनमध्ये नगर पालिका प्रशासनाबाबत कमालीचा असंतोष व्यक्त केला जात आहे.याबाबत सर्व नागरिकांच्या वाढत्या तक्रारी व समस्यांची दखल घेऊन ‘ नॅशनल अँटी करप्शन क्राईम अँड कंट्रोल ब्युरो अमरावती या सामाजिक कार्यांच्या आघाडीवर असलेली संस्थाच्या वतीने नुकतेच मुख्याधिकारी नगरपरिषद अंजनगाव सुर्जी यांना दिलेल्या निवेदनद्वारा मागणी करण्यात आली आहे.
सदरील निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,शहरातील सुर्जी परिसरातील सती माता मंदिरासमोरील ते आठवडे बाजारापर्यंत नदीतील बांधण्यात आलेल्या नविन पुलाचे बांधकाम गेल्या दिड वर्षापासून झाले असून पुलाचे दोन्ही साईडचे रस्त्याचे काम (अपूर्ण) रखडलेले आहे.सदरहू पुलाच्या दोन्ही बाजूंनी रस्ता खराब झाला असून तेथे पावसाच्या पाण्यामुळे पाणी साचत आहे तसेच मोठे-मोठे खड्डे पडल्याने नागरिकांना जाण्या-येण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे परिणामी येथे दुचाकी वाहन व पायदळ चालणाऱ्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे सदरील रस्त्याचे काँक्रिटीकरण लवकर करण्यात यावे तसेच महात्मा फुले मार्केट बुधवारा येथील नदी किनाऱ्यापासून ते भोईपुरा नगर परिषद शौचालयपर्यंत बांधण्यात आलेली भिंत जीर्ण होऊन कोसळत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्याचबरोबर नदीला पूर आल्याने सदरील पाणी शेजारील वस्तीत शिरल्यामुळे रहिवाश्यांच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे.तसेच या वस्तीस्त नाल्या पूर्ण फुटलेल्या असल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.सदरहू सदरील नाल्यांची सफाई करण्यात येऊन बांधून देण्यात याव्या व नागरिकांच्या समस्या सोडवावी असे निवेदनात म्हटले आहे.सदरहू मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे यांनी सदरील निवेदनाची तात्काळ दखल घेत कामांचे सर्वे करून इस्टिमेट तयार करण्यात आले असून सगळी कामे निधी उपलब्ध झाल्यावर होतील याबाबतचे नियोजन करून ठेवले आहे परिणामी हि कामे लवकरच मार्गी लावली जातील असे आश्वासन दिले असल्याचे नॅशनल अँटीकरप्शन कंट्रोल ब्युरो अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल शामलाल गौर यांनी म्हटले आहे.
यावेळी नॅशनल अँटीकरप्शन कंट्रोल ब्युरो अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल शामलाल गौर,उपाध्यक्ष गजानन खंगार,जिल्हा कार्याध्यक्ष गणेश वानखडे,जिल्हा सचिव मंगेश चिलात्रे,सदस्य कपिल उसरे,सुफियान कुरेशी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.