Just another WordPress site

“नरेंद्र मोदींनी शरद पवार यांची बदनामी केल्याबद्दल त्यांची माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन करू”-प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.५ ऑगस्ट २३ शनिवार

मध्य प्रदेशातील भोपाळ येथे भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीत पंतप्रधानांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर सिंचन घोटाळा,सहकारी बँक घोटाळा आणि बेकायदेशीर खाण घोटाळा यासह अनेक घोटाळ्यांचे आरोप केले होते.आता ७० हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात नरेंद्र मोदींनी गुन्हे दाखल करावेत किंवा शरद पवारांची माफी मागावी असे न केल्यास आम्ही आंदोलन करु असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण वृत्तवाहिन्यांवर प्रसारित करण्यात आले असून इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजन चॅनेलवर अनेकवेळा ते वृत्त दाखवण्यात आले आहे.जर देशाचे पंतप्रधान असे आरोप जाहीरपणे करत असतील तर ते ठोस माहिती आणि पुराव्यांवरून करीत असावेत जे त्यांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या ED,CBI,इन्कम टॅक्स या एजन्सींच्या माध्यमातून खात्री केले असावेत म्हणून आम्ही पंतप्रधानांना विनंती करतो की त्यांनी १० दिवसांच्या आत भ्रष्टाचारात गुंतलेल्या व्यक्तीवर फौजदारी खटले दाखल करावेत आणि ७० हजार कोटींचा समावेश असलेल्या या आरोपांसाठी पुनर्प्राप्ती प्रक्रिया सुरू करावी अन्यथा खोटे आरोप करून बदनामी केली म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार यांची बदनामी केल्याबद्दल त्यांची जाहीर माफी मागावी असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

निवडणुकीतील फायद्यासाठी ठोस पुराव्याशिवाय वरिष्ठ नेतृत्वाची बदनामी करणे नैतिकतेला धरून नाही आणि राजकारणात ते केले जाऊ नये.एकतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरोप सिद्ध करावेत किंवा शरद पवार यांची बदनामी केल्याबद्दल त्यांची माफी मागावी.दहा दिवसांत पंतप्रधानांनी माफी न मागितल्यास तीव्र आंदोलन करू असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.शरद पवार हे I.N.D.I.A. चा भाग आहेत त्यामुळे आम्ही काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.