Just another WordPress site

“सोशल मीडियावरील वादग्रस्त मजकूर आणि स्टेटसमुळे राज्यात हिंसाचार”-सुजय विखे पाटील यांचे विधान

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.७ ऑगस्ट २३ सोमवार

मागील काही दिवसांत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली घडल्या असून व्हॉट्सअॅपवर औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी औरंगाबादमध्ये हिंदू-मुस्लीम समुदायात तणाव निर्माण झाला होते तर काही दंगलखोरांनी तोडफोड आणि जाळपोळ केली होती.अहमदनगरमध्येही हिंदू-मुस्लीम दंगल घडली दरम्यान शनिवारी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जनआक्रोश राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील कथित लव्ह जिहाद आणि धर्मांतर प्रकरणी हा मोर्चा काढला होता.या घडामोडीनंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.सोशल मीडियावरील वादग्रस्त मजकूर आणि स्टेटसमुळे राज्यात हिंसाचार घडत आहे अशा आशयाचे विधान सुजय विखे पाटील यांनी केले असून ते अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.यावेळी सुजय विखे पाटील म्हणाले की,मोबाईलवरील वादग्रस्त मेसेज आणि स्टेटसमुळे राज्यात हिंसाचार घडत आहे हे या समाजाचे दुर्दैव आहे.मोबाईलवर बंदी आणण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे.मोबाईलवरून कुणी काहीही मेसेज टाकतो यामुळे कुणाच्या तरी भावना दुखावतात त्यानंतर भावना दुखावणारे वेगळेच असतात पण तोडफोड आणि जाळपोळ वेगळेच लोक करतात यात आरोपी वेगळेच असतात असे वातावरण समाजासाठी फार घातक आहे या मताचा मी आहे याचे नियंत्रण कसे करावे? हा मुख्य प्रश्न आहे यासाठी आई-वडिलांनी आपली जबाबदारी योग्यपणे पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे.

खासदार विखे पाटील पुढे म्हणाले,राज्यात अनेक प्रकारचे गुन्हे घडत आहेत जसे की लव्ह जिहाद,मुली पळून जाणे,मुलींची छेड काढणे, सोशल मीडियावर शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद मजकूर लिहिणे किंवा व्हिडीओ अपलोड करणे अशा अनेक घटना घडत आहेत. आई-वडिलांनी मुलांना योग्य संस्कार न दिल्याने अशा घटना वाढल्या आहेत कारण वडील दिवसभर कामानिमित्ताने बाहेर असतात तसेच आई घरातल्या कामात व्यग्र असते त्यामुळे आई वडिलांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही त्यामुळे मी सगळ्या आई-वडिलांना विनंती करेन की तुम्ही तुमच्या मुलाबरोबर बसले तर हा प्रश्न सुटेल अन्यथा आपला महाराष्ट्र किंवा आपला जिल्हा अत्यंत वाईट अवस्थेत जाईल.जिल्ह्याचा विकास होत राहील पण सध्या जे काही सुरू आहे हे कुणीच थांबवू शकणार नाही अशा घटना थांबवणे एखाद्या खासदाराचे किंवा पोलिसांचेही काम नाही.प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलाची जबाबदारी घेतली तर सामूहिक प्रयत्नांमधूनच सामाजिक शांतता ठेवता येईल असेही सुजय विखे पाटील यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.