चिंचोली काळे येथे शेतात ई पिक पाहणी व प्रशिक्षण संपन्न
आमदार बच्चु कडू व तहसीलदार गीतांजली गरड यांच्या समक्ष झाले ई पिक पाहणी प्रशिक्षण
अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
चांदुर बाजार तालुक्यातील चिंचोली काळे येथे दि.५ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी आमदार बच्चु कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रत्यक्ष चिंचोली काळे येथील शेतावर जाऊन शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी तलाठी आशिष काळे यांनी आमदार बच्चु कडू व शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच चिंचोली काळे येथील आपातग्रस्त कुटुंबाला चार लाख रुपयाचा आर्थिक मदतीचा धनादेश प्रदान करण्यात आला.यावेळी तहसीलदार गीतांजली गरड, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड तसेच शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.