अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आभासी पद्धतीने काल दि.६ ऑगस्ट रविवार रोजी उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला धामणगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार प्रताप अडसड,तहसीलदार वशीमा शेख,एस.डी.ओ.जोगी,कॅप्टन महाजन,नूडल अधिकारी श्रीवर्मा,रावसाहेब रोठे या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागतापासून करण्यात आली त्यानंतर पवार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला तसेच यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.प्रसंगी आमदार प्रताप अडसड यांनी देशभक्ती गीत सादर केले व त्यानंतर आभासी पद्धतीने कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.यानिमित्ताने १९.२८ करोड रुपयांच्या कामाला सुरुवात धामणगाव रेल्वे स्टेशनवर होणार आहे.यामध्ये सर्क्युलेटिंग एरिया रोड,पोहोच रस्ता,ड्रोनेज वर्क,पार्किंग एरिया,पाथवेज,लँड स्पेकिंग आणि हार्टिकल्चर,बागेची सजावट आणि शिल्पे,यार्ड मध्ये सीमा भिंत, प्रवेशद्वार पोरचेस आणि गेट्स,दर्शनी भाग आणि उंची,स्वच्छालय आणि वेटिंग हॉल सुधारणा,फुट ओवर ब्रिज,सायनेज,उत्तम दर्जाचे फर्निचर,प्लॅटफॉर्मवर कव्हर इलेक्ट्रिकल वर्क,दूरसंचार प्रवासी सुविधा इत्यादीचा समावेश होणार आहे.यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने धामणगाव शहरातील नागरिक उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाला रेल्वे कर्मचारी,अधिकारी,आरपीएफ स्टॉफ यांनी परिश्रम घेतले.