अनिल गौर,पोलीस नायक
अमरावती जिल्हा (प्रतिनिधी) :-
जिल्ह्यातील तसेच (अंजनगाव सुर्जी) तालुक्यातील शेलगाव,वढाळी,धाडी,दहिगाव रेचा,राजधरी,खिरपानी जाणारा रस्ता अवघ्या दोन अडीच वर्षापूर्वी नव्याने डांबरीकरण झालेला रस्ता हा अपघाती रस्ता बनला असुन अवघ्या दोन अडीच वर्षात रस्त्यांवर खड्डे पडले आहे.सदरील रस्त्याचे डांबरीकरण करणेबाबत ग्रामपंचायतने पत्र देऊनही जिल्हा परिषद बांधकाम विभाग मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
सदरील रस्त्याचे अवघ्या दोन अडीच वर्षापूर्वी नव्याने डांबरीकरण झालेला रस्ता हा अपघाती रस्ता बनला असुन रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहे तसेच रस्त्याच्या कडेने मोठ्या प्रमाणात काटेरी झुडूप वाढले असुन ते त्यावर लोंबत असुन रस्त्याने जातांना खड्डे वाचवावे की डोळ्यांना लागणारे काटेरी झुडुप अशी परिस्थिती वाहन चालकांवर आलेली आहे.त्यामुळे बऱ्याच वेळा रस्त्याने अपघात झाले आहेत तसेच दहिगाव रस्त्यावरील शिंदेही नाल्यावर पुल बांधला असता त्या पुलाला संरक्षित दगड तयार केले नसुन तेवढ्या पुलाच्या भागात डांबरीकरण केले नसल्याने अलीकडे व पलीकडे मोठ मोठे खड्डे पडले आहेत वाहन चालकांना वाहन न्यावे तरी कसे असा विचार पडला आहे तसेच अडगोकर यांच्या शेताजवळ रस्त्यावर लहान नाली असुन त्यावर सुद्धा अजुन पर्यंत पुल बांधला नसुन अनेक तिन चाकी,चार चाकी व दुचाकी वाहन चालकांचे वाहने आढळल्याने अनेक अपघात झाले यावर दहिगाव रेचा ग्राम पंचायतने जिल्हा परिषद बांधकाम विभागाला पत्र पाठवून रस्ता संबंधी अवगत केले परंतु जिल्हा परिषद बांधकाम विभाग हे सुस्त व उदासीन असल्याचे दिसत आहे नागरिकांचे असे म्हणणे आहे.